Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आंबेडकर – ठाकरे यांनी जाहीर केली युती; शरद पवारही होतील सामील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

आंबेडकर – ठाकरे यांनी जाहीर केली युती; शरद पवारही होतील सामील

Surajya Digital
Last updated: 2023/01/23 at 5:29 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : अखेर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज युतीची घोषणा केली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचे आज मुंबईतल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.  Balasaheb Ambedkar – Uddhav Thackeray announces alliance; Sharad Pawar will also join Bhimshakti Shivshakti यानंतर शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा आहे, असे आंबेडकरांनी म्हटले आहे. पवार यांच्याशी माझे मुद्याचे भांडण आहे, हा वैचारिक वाद आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच काँग्रेसने आपली निवडणूक रणनिती बदलायला हवी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

 

अखेर ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी हे जाहीर केले आहे. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित नव्हते. मात्र शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याने याचा परिणाम मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवर होईल, असा अंदाज आहे. लवकरच महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमधील जागावाटप जाहीर केले जाणार आहे.

 

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97व्या जयंतीचे औचित्य साधून या युतीची घोषणा करण्यात आली, असे ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी सांगितले. यावेळी ठाकरे गट आणि वंचित आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी संजय राऊत हेही उपस्थित होते. सुभाष देसाई यांनी युती संदर्भातील प्रास्ताविक केले.

 

ठाकरे गटाशी आज वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मोदींनी स्वतःच्या पक्षातील नेतृत्व संपवले आहे, केंद्रातील काही मंत्री आमचे फक्त फाईली घेऊन जायचे काम असल्याचे म्हणत आहेत, पण एक दिवस मोदींचीही सत्ता जाणार, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आले नाहीत,’ असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

#Shivshakti_Bhimshakti@Prksh_Ambedkar @OfficeofUT @AUThackeray @waglenikhil#म_मराठी#शिवशक्ती_भीमशक्ती#लोकशाही #संविधान pic.twitter.com/iBXYE1V8X7

— Dhanraj Garad (@dhanraj_garad) November 21, 2022

 

 

मागील दोन दिवसांपासून स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेले सुतोवाच आणि ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी त्याला दिलेला दुजोरा पाहता, ही युती होणार अशी अटकळ होती. अशात आज सोमवारी (23 जानेवारी) सकाळीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत या युतीबद्दल जवळपास खात्री वर्तवली होती. ‘शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार, संयुक्त पत्रकार परिषद. 23 जानेवारी दुपारी 12.30 वाजता. आंबेडकर भवन, नायगाव, दादर महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व.’ अशा प्रकारचे ट्विट राऊत यांनी केले होते.

 

दादरच्या आंबेडकर भवनात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले होते. सुरुवातीला दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केले, त्यानंतर शिवशक्ती – भीमशक्तीच्या एकत्र येण्याची गरज बोलवून दाखवत, राज्याच्या राजकारणातील नव्या पर्वाची नांदी ठरणाऱ्या या ऐतिहासिक युतीची घोषणा केली. यावेळी दोन्ही पक्षाचे अनेक मान्यवर, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळातील वाईट प्रथांवर प्रहार केले. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरू आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देश प्रथम हा मुद्दा महत्त्वाचा घेऊनच आम्ही एकत्र आलो आहोत. परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आमच्यासोबतचे जे सहकारी आहेत. ते एकत्र येऊन काम करणार आहोत.’

 

संविधानाचं पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. राजकीय वाटचाल कशी असेल ते परिस्थितीनुसार निर्णय घेऊ. तळागाळातील जनतेपर्यंत जे काही देशात चालले आहे. ते पोहोचवण्याची गरज आहे. परवा पंतप्रधान आले. सभेला कोण आले. कुठून आले. त्यांना काय सांगितले. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा अन् निवडणुका गेल्यावर गरीब रस्त्यावर आणि त्यांची उड्डाण सुरू असतात. ते रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #BalasahebAmbedkar #UddhavThackeray #announces #alliance #SharadPawar #join #Bhimshakti #Shivshakti, #आंबेडकर #ठाकरे #जाहीर #युती #शिवशक्ती #भीमशक्ती #शरदपवार #सामील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । डंपरच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू, चार महिन्यात चौथा बळी; आणखी किती बळी घेणार ?
Next Article ऊसाला आलाय तुरा; पर्याय कायतरी करा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?