सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावरून हरणांचा कळप खाली कोसळून त्यात एकाचवेळी १४ काळविटांचा आज (ता.28) दुर्दैवी मृत्यू झाला. सोलापूर – पुणे महामार्गावरील केगाव येथे विजापूर राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळणावर आज सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. Kalveet Unfortunate death accident of 14 Kalvites in Solapur
दुर्घटनेचे फोटो व्हायरल होत आहेत. ही घटना सोशल मीडियावर वा-यासारखी व्हायरल होत आहेत. या घटनेला वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दुजोरा दिल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा मुद्दा एरणीवर आला आहे.
केगाव – विजापूर राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळणावर देशमुख वस्तीनजीक उड्डाणपूल आहे. या भागात हरणांसह काळविट व इतर वन्य प्राण्यांच्या कळपांचा नेहमीच वावर असतो. आसपासचा बहुतांशी परिसर सपाट आणि तुलनेत कमी वर्दळीचा आहे. हरीण व काळविटांचे कळप राष्ट्रीय महामार्गावर येतात आणि रस्ता ओलांडून पुढे जातात. रस्त्यावरील वाहनांमुळे भीतीने पुढे पळत असताना अपघात होतात. उड्डाणपुलावरून पुढे पळताना काळविटांचा कळप उड्डाणपुलावरून खाली कोसळतो आणि त्यांचे जीव जातो, असे प्रकार नेहमीच घडतात, असे उपस्थित त्या परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हरणांचा कळप पुलावरून खाली पडला आहे.
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. माहिती कळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. जवळपास 14 हरणांचा या घटनेत मृत्यू झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले . काळवीटांचा कळप माळरानावर अन्न – पाण्याच्या शोधात फिरत होता. त्यावेळी काही भटकी कळपांच्या मागे लागल्याने काळवीट रस्ता मिळेल त्या दिशेने सुसाट धावत होती. देशमुख वस्ती परिसरात नवीन बायपास रस्ता लगतच्या सर्व्हिस रस्तानंतर अचानक 30 फुट खोल भुयारी मार्ग केलेला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
माळरानावरून सर्व्हिस रोडकडे पळत आलेल्या काळवीट पुढे रस्ता असेल असे समजून टाकलेली उडी 30 फूट भुयारी रस्त्यावर पडली. उंचावरून डोक्यावर आदळल्याने काळविटाचा जागीच मृत्यू झाला. ‘ या भागातून नेहमीच हरणं आणि इतर प्राणी रोड क्रॉस करत असतात. घटनेच्या वेळी अचानक वाहन समोर आल्याने हरणाच्या कळपाने पुलावरून उडी मारली असेल आणि एकाच वेळी त्यांचा मृत्यू झाला असेल, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
मार्च 28 मार्च 2022 रोजी या परिसराची दुर्घटना घडली होती. त्यावेळी रस्त्याचा अंदाज मारणे एका काळवीट मृत्यूमुखी पडले होते. यावेळी 14 काळवीट कळप रस्त्यावर पडला . या घटनेची माहिती कळताच उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनाधिकारी बाबा हाके, लक्ष्मण आवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे, मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून वन विभागाचे पथक दाखल झाले आहे. जवळपास 14 हरणांचा या घटनेत मृत्यू झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
या घटनेच्या अनुषंगाने स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. ‘या भागातून नेहमीच हरणं आणि इतर प्राणी रोड क्रॉस करत असतात. घटनेच्या वेळी अचानक वाहन समोर आल्याने हरणाच्या कळपाने पुलावरून उडी मारली असेल आणि एकाच वेळी त्यांचा मृत्यू झाला असेल’ असा अंदाज सोलापूर वन विभागाचे प्रमुख, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी वर्तवला आहे.
नवीन बायपास रस्त्यावरील देशमुख वस्ती येथे सर्व्हिस रोडलगत मोठा भुयारी रस्ता आहे . वन्यप्राणी माळरानावरून पळत जाताना थेट त्या भुयारी रस्त्यावर पडण्याचा धोका आहे . भविष्यात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यासाठी सर्व्हिस रस्ता लगतच्या कठड्यास दहा फुट उंचीची जाळीचे संरक्षक कुंपण उभारण्याची मागणी वन्यजीव प्रेमीनी केली आहे .