Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभयारण्याला माळढोकचे पुनर्वेभव लाभणार; पन्नास एकर जागेवर प्रजनन केंद्र उभारणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

अभयारण्याला माळढोकचे पुनर्वेभव लाभणार; पन्नास एकर जागेवर प्रजनन केंद्र उभारणार

Surajya Digital
Last updated: 2023/02/12 at 6:41 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : पक्षीमित्रांच्या मनावर अधीराज्य गाजवणाऱ्या पण नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याला वाचविण्यासाठी पुणे वन विभागाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.  The sanctuary will benefit from the revitalization of Maldok; Solapur will set up a breeding center on fifty acres of land या पक्ष्याच्या संवर्धनासाठी राज्यातील पहिले ‘माळढोक संवर्धनात्मक प्रजनन केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे माळढोकचे माहेरघर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्यातील पन्नास एकर जागा निश्चित करण्यात आली आहे.

Contents
● राज्यातील पहिलाच प्रकल्प :स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ २०१२ मध्ये मांडली होती संकल्पना○ राज्यात एकच माळढोक○ अस्तित्त्वाची लढाई…

 

या संदर्भातील प्रस्तावाचे काम सुरू असून, लवकरच तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल; तसेच राजस्थान सरकारकडे माळढोक पक्ष्याची अंडी आणि एक नर-मादीची जोडी द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. नान्नज अभयारण्य खास माळढोक पक्ष्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत माळढोकची संख्या झपाट्याने कमी होऊन सध्या तेथे केवळ एकच पक्षी वास्तव्यास आहे.

 

माळढोकचे अस्तित्व असलेल्या सर्वच राज्यांमध्ये ही परिस्थिती असून, यावर पक्ष्याचे अस्तित्व राखण्यासाठी केंद्रीय वन्यजीव संवर्धन संस्थेने ‘संवर्धनात्मक प्रजनन प्रकल्पाचा पर्याय दिला आहे. या पूर्वी गिधाडांच्या संवर्धनांसाठी केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालयाने हा मार्ग स्वीकारला होता.

 

अलीकडेच माळढोकसाठी राजस्थानमध्ये जैसलमेर येथे पहिला ‘संवर्धनात्मक प्रजनन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. देशातील दुसरा प्रकल्प आता सोलापूरमध्ये सुरू होत आहे.

 

● राज्यातील पहिलाच प्रकल्प :

या संदर्भात पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण म्हणाले, ‘नान्नज माळढोक अभयारण्याचा समावेश पुणे वन विभागाच्या कार्यक्षेत्रात होतो. काही दिवसांपूर्वीच आम्ही जागेची पाहणी केली आहे. प्रकल्पासाठी ५० एकर जागा निश्चित केली आहे. प्रकल्पासाठी मोठे क्षेत्र आवश्यक असते. यामध्ये वैद्यकीय, संशोधन देखरेखीखालील क्षेत्र आणि पक्ष्याला मुक्तपणे वावरता येईल असा नैसर्गिक; पण बंदिस्त अधिवास राखीव ठेवला जातो.

संशोधन विभागात इनक्युटेबर, हॅचर, पिल्लांच्या संगोपनासाठी वेगवेगळे कक्ष असतात. यात पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे पथक पूर्णवेळ कार्यरत असते.’ ‘सध्या जैसलमेर येथे याच प्रकारचा प्रकल्प कार्यरत असून, याच धर्तीवर राज्यातील पहिला प्रकल्प लवकरच साकारणार आहे. प्रस्तावाचे काम सुरू असून, राज्य सरकारतर्फे तो केंद्रीय मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. राजस्थान सरकारने प्रकल्पासाठी माळढोक पक्ष्याची अंडी आणि एक जोडी द्यावी अशी मागणीही करणार आहोत,’ असेही चव्हाण यांनी सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

○ २०१२ मध्ये मांडली होती संकल्पना

 

राज्यात माळढोक संवर्धनाची संकल्पना २०१२ मध्ये मांडण्यात आली. राज्य वन्यजीव मंडळाने २०१४ मध्ये या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला होता. एवढेच नव्हे, तर राज्य सरकारने प्रकल्प उभारणीसाठी निधीही जाहीर केला. मात्र, पुढे काहीच घडले नाही. आता राज्यात एकच पक्षी राहिल्याने पुन्हा एकदा वन विभागाने प्रकल्पासाठी कंबर कसली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या सहभागातून नान्नजमध्येच प्रजनन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

○ राज्यात एकच माळढोक

वीज वाहिन्यांचा शॉक लागल्याने, शिकारी, आधुनिक शेतीची प्रक्रिया, कीटकनाशकांचा वाढता वापर, संरक्षित क्षेत्रातील मानवाच्या हस्तक्षेपामुळे अनेक पक्ष्यांची संख्या गेल्या तीन दशकांत घटली आहे. नवीन बदल आत्मसात करण्यास अपयशी ठरलेल्या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, काही राज्यांतून हे पक्षी नामशेष झाले आहेत. माळढोक याच पक्ष्यांमधील एक असून, राज्यात सध्या एकच पक्षी राहिला आहे.

 

○ अस्तित्त्वाची लढाई…

आंतरराष्ट्रीय पातळीवर माळढोकचा समावेश लाल यादीत – भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार माळढोक संकटग्रस्त देशातील माळढोकची संख्या केवळ सव्वाशे ते – दीडशे – राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये वावर माळढोक हा राजस्थानचा राज्यपक्षी सर्वाधिक सव्वाशे – माळढोक एकट्या राजस्थानमध्ये महाराष्ट्रात सध्या एकच माळढोक वास्तव्यास-मध्य प्रदेशात या पक्ष्याचे अस्तित्व नामशेष होत आहे.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #sanctuary #benefit #revitalization #Maldok #Solapur #setup #breeding #center #fiftyacres #land, #अभयारण्य #सोलापूर #माळढोक #पुनर्वेभव #लाभणार #पन्नास #एकर #जागा #प्रजननकेंद्र #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल, भगतसिंग कोश्यारी पायऊतार
Next Article कुंभारी एमआयडीसीचे भूसंपादन लवकरच; सोलापुरात एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाची घोषणा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?