Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: साखर पट्ट्यात लागली स्ट्रॉबेरीची गोडी; 45 डिग्री तापमानात बहरली लालचुटुक स्ट्रॉबेरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

साखर पट्ट्यात लागली स्ट्रॉबेरीची गोडी; 45 डिग्री तापमानात बहरली लालचुटुक स्ट्रॉबेरी

Surajya Digital
Last updated: 2023/02/12 at 8:56 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

○ स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात यशस्वी

सोलापूर/ शिवाजी हळणवर

Contents
○ स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात यशस्वीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

सोलापूर जिल्ह्यातील साखर पट्ट्यात स्ट्रॉबेरी शेतीची अनेक तरुण शेतकऱ्यांना गोडी लागली आहे. वांगी नं ३ (ता.करमाळा) येथील विकास वाघमोडे या तरुणाने स्ट्रॉबेरी शेतीचा नवा प्रयोग यशस्वी केला आहे. Strawberry sweet in sugar belt; Red strawberry bloomed at 45 degree temperature Agriculture News Agriculture Karmala Eggplant ४५ डिग्रीपर्यंत उष्ण हवामान असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ऊस, केळीबरोबरच आता स्ट्रॉबेरीची शेतीसुध्दा चांगली पिकते हे त्याने प्रयोगांती सिद्ध करुन दाखवत आतापर्यंत सव्वा दोन लाखाचे उत्पन्न मिळाले असून आणखी दोन लाखाचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.

स्ट्रॉबेरी म्हटले की आपल्या नजरेसमोर महाबळेश्‍वर येते. परंतु आता स्ट्रॉबेरीची चव चाखण्यासाठी महाबळेश्‍वरला जाण्याची गरज उरलेली नाही. स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात यशस्वी झाला आहे. महाबळेश्वर येथील मित्राच्या अनुभवाच्या जोरावर त्याने यंदा सात गुंठे क्षेत्रावर चार हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली आहे. तालुक्यात ऊस, केळीसह इतर फळ पिकांचे क्षेत्र मोठे आहे. अशा पारंपारिक पिकाबरोबरच कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणारी पिके घेतली जावू लागली आहेत. यामध्ये आता स्ट्रॉबेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील हवामान स्ट्रॉबेरीसाठी प्रतिकूल असल्याने येथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ शकणार नाही असा समज होता. परंतु हा निष्कर्ष चुकीचा ठरवत वांगी तालुका करमाळा येथील विकास वाघमोडे या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचे चॅलेंज स्वीकारत उजनी धरणाच्या काठावर असलेल्या वांगी गावांमध्ये मुख्यतः ऊस व केळी हीच पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. या दोन्ही पिकांमध्ये उत्पादन चांगले मिळत असले तरी या पिकासमोर ही भविष्यात अनेक अडचणी असल्याने या परिसरातील शेतकरी फळबागांसारखा नवीन पर्याय शोधण्यात सुरू केला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हवामानात आजपर्यंत होऊ न शकलेले अनेक प्रयोग शेतकरी यशस्वी करत असून यामध्ये भरघोस उत्पादन मिळवणे शक्य करून दाखवले आहे.

 

कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता सात गुंठे क्षेत्रावर नोव्हेंबरमध्ये त्यांनी सातारा जिल्ह्यातील भिलारवरून रोपे आणून स्ट्रॉबेरीची एक फुट अंतरावर बेडवर लागवड केली. कसल्याही रासायनिक खताचा वापर न करता एस.पी ॲग्रोटेकचे सागर पार्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक खतांचा वापर करत उत्कृष्ट असा प्लॉट तयार केला. साधारण एक लाख रुपये खर्च झाला. आत्तापर्यंत त्यांनी स्वतः स्थानिक बाजारपेठेत व बारामती, बार्शी येथील व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून जागेवर स्ट्रॉबेरीची खरेदी केली सरासरी तीनशे रुपयाचा दर मिळवून सव्वा दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आणखी दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. सध्या स्टॉबेरी शेतीचा प्रयोग या परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत असून‌ पुढील वर्षी या परिसरातील अनेक शेतकरी हे पिक घेण्याच्या तयारीत आहेत.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

या विषयी अधिक माहिती देताना स्टॉबेरी उत्पादक शेतकरी विकास वाघमोडे म्हणाले, जिल्ह्यात असणाऱ्या उष्ण हवामानात स्टॉबेरीचे उत्पादन होऊ शकत नाही, असे अनेक शेतकरी मला सांगत होते. परंतु आपण प्रयोग तरी करून बघू म्हणून मी थोड्या क्षेत्रावर लागवड केली होती. माझ्या शेतातातील तयार झालेली स्टॉबेरी मी महाबळेश्वर येथील मित्राला पाठवली. त्यांनी पिकांची गुणवत्ता व चव येथिल स्टॉबेरी पेक्षा उत्तम असल्याचे सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

पुढील वर्षी आणखी जादा क्षेत्रात लागवड करणार आहे. गावातील इतर शेतकऱ्यांची हे पिक घेण्याची तयारी आहे. या पिकासाठी होणारा खर्च जादा असल्याने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना रेफर व्हॅनसारख्या विविध सुविधा व अनुदान उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

 

 

You Might Also Like

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी

सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग

पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव

सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट

TAGGED: #करमाळा #वांगी #शेतीवार्ता, #साखर #पट्ट्यात लागली #स्ट्रॉबेरी #गोडी #45डिग्री #तापमान #बहरली #लालचुटुकस्ट्रॉबेरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कुंभारी एमआयडीसीचे भूसंपादन लवकरच; सोलापुरात एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयाची घोषणा
Next Article सीआयडी मालिकेमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीचे हरवलेले दागिने बारा तासात रिकव्हर

Latest News

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
देश - विदेश May 9, 2025
संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Top News May 9, 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
सोलापूर May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
सोलापूर May 9, 2025
सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
सोलापूर May 9, 2025
crime
पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
सोलापूर May 9, 2025
पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?