सोलापूर : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेननंतर मुंबई-हैद्राबाद ही दुसरी बुलेट ट्रेन मंजूर झाली असून ती यापूर्वी सोलापूरमार्गे हैद्राबादला जाणार होती. मात्र आता ती माळशिरस, अकलूज, पंढरपूरवरून सोलापूर मार्गे हैद्राबादला पोहचणार आहे. Mumbai-Hyderabad bullet train will run through Akluj-Pandharpur, read the route Solapur MP Ranjitsinh Naik-Nimbalkar या नवीन मार्गास पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असल्याची माहिती माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.
मुंबई – अहमदाबाद नंतर मुंबई- हैद्राबाद ही दुसरी बुलेट ट्रेन यापूर्वीच मंजूर झाली आहे. मात्र तिचा नियोजित मार्ग हा सोलापूरवरूनच जाणार होता. भारताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पांडुरंगाच्या पंढरीतील वारकऱ्यांनाही या बुलेट ट्रेनने प्रवास करता यावा, यासाठी ही बुलेट ट्रेन माढा लोकसभा मतदारसंघातून जावी, अशी मागणी यापूर्वीच माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली होती.
त्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी, रेल्वेमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून या मागणीसाठी पाठपुरावा केला होता. त्याला आता रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असून लवकरच तांत्रिक मान्यतेचा आदेशही काढला जाणार आहे, अशी माहिती खासदार नाईक-निंबाळकर यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● ताशी ३५० कि.मी. वेग
या मार्गावर प्रति तास ३५० किलोमीटरच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे, तसा त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे, हा वेग सरासरी २५० कि.मी. प्रति तास असेल. रूळ स्टैंडर्ड गेजचे असतील. एका ट्रेनची प्रवासी क्षमता ७५० असणार आहे. आत्ता मुंबई- हैद्राबाद प्रवास करण्यासाठी १४ तास लागतात. हा प्रवास बुलेट ट्रेनमुळे अवघ्या तीन तासांत पूर्ण होणार आहे.
● असा असेल मार्ग :
एकूण ७११ किलोमीटरच्या मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबई, ठाणे, नवीमुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, माळशिरस, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विक्रमाबाद या मार्गे ही ट्रेन हैद्राबाद येथे पोहचणार आहे. यामध्ये अकरा रेल्वे स्थानकांचा समावेश असणार आहे. मुंबई ते हैद्राबाद प्रवास केवळ तीन तासात पूर्ण होणार आहे.
● प्रतीक्षा कॅबिनेटच्या मंजुरीची
मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्प एनएचआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनला सादर करण्यात आला. त्याचा पीएफआर रिपोर्ट व डीपीआर रिपोर्ट झाला आहे. टेक्निकल सर्व्हेसुध्दा चालक विरहित विमानातून झाला आहे. रेल्वे मंडळाला सादर केलेल्या डीपीआरला लवकरच कॅबिनेटच्या बैठकीत तांत्रिक मंजुरी मिळेल, असा विश्वास खा. नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.
○ तीर्थक्षेत्रात घालणार अभिषेक
मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन माढा लोकसभा मतदारसंघातून नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे. म्हणून यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, शिंगणापूर आदी प्रसिध्द मंदिरांत अभिषेक घालून तेथील प्रसाद घेऊन पंतप्रधानांना भेटणार आहे.
– रणजितसिंह नाईक-निंबाळकर (खासदार- माढा लोकसभा)