● वाहनाचे टायर व केबिन जळून खाक !
सोलापूर : जुळे सोलापूर येथील महापालिकेच्या एचएसआर रॅम्प येथे एका आरसी वाहनास अचानकपणे आग लागली. Jule Solapur: Municipal RC vehicle caught fire due to battery short circuit! Solapur यामध्ये या वाहनाचे टायर व केबिन जळून खाक झाले. गुरुवारी (ता. 16) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी पाणी मारून ही आग आटोक्यात आणली. कोणतीही जीवित हानी झाली नाही.
सोलापूर महापालिकेच्या घंटागाड्या रिकाम्या करण्यासाठी जुळे सोलापूर येथे एचएसआर येथे रॅम्प आहे. या एचएसआर रॅम्प येथे दुपारच्या पाळीत घंटागाड्या रिकामी करण्यासाठी आलेले आरसी वाहन ( क्रमांक एमएच 13 सीजे 9032) चालक कृष्णा इरकल आणि ऑपरेटर विवेक माने हे घेऊन आले. गुरुवारी सायंकाळी 5.11 वाजता हे आरसी रॅम्पवर लावल्यानंतर वजन काटा पाहण्यासाठी वाहन चालक हे आतल्या बाजूस गेले. त्यादरम्यान बॅटरी शॉर्टसर्किट झाल्याने अचानकपणे आरसी वाहन पेट घेतले.
या वाहनाची बॅटरी आणि त्या लगतच टायर असल्याने या शॉर्टसर्किटमध्ये टायर पेट घेतले आणि बघता बघता या वाहनाच्या केबिनमध्ये ही आग पसरली. या आगीत टायरसह केबिन जळून खाक झाले. दरम्यान येथील कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला संपर्क साधला. काही वेळातच महावीर चौकातील अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली.
यामध्ये कोणतीही जीवित हानी अथवा कुणालाही इजा झाली नाही. यामध्ये या आरसी वाहनाचे सुमारे दहा लाख रुपयाचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. एक फेब्रुवारीपासून दोन शिफ्ट मध्ये कचरा संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान आजचे हे आरसी वाहन पहिली शिफ्ट करून दुसरी शिफ्ट कार्यरत होते. त्यातच कडक ऊन असल्याने येथील बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाले आणि वाहन पेटले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी रूपाभवानी चौक येथील रॅम्प या ठिकाणीही अशा प्रकारे आरसी वाहन पेटले होते. त्यानंतर आता ही दुसरी घटना घडली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी ही घटनास्थळी भेट दिली. आवश्यक ती कार्यवाही केली.
महापालिकेच्या घनकचरा विभागाकडे कचरा संकलनासाठी आणखी वाहनाची गरज लक्षात घेऊन नव्या चार आरसी वाहनांची मागणी करण्यात आली आहे. काही दिवसातच हे आरसी वाहन महापालिकेच्या ताफ्यात दाखल होईल, अशी माहिती मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांना महाराष्ट्र शासनाचा मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार जाहीर
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालय मुंबई तर्फे देण्यात येणारा मराठी भाषेसाठी केलेल्या कार्याबद्दल दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये दोन लाख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
प्रा.डॉ.द.ता.भोसले यांनी आतापर्यंत मराठी भाषेसाठी ग्रामीण बोलीचा संग्रह (दोन), दुर्मिळ म्हणींचा संग्रह (तीन) या विशेष योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा.डॉ.द.ता.भोसले यांनी आतापर्यंत मराठी भाषेत चार कादंबऱ्या, बारा कथासंग्रह, आठ ललित ग्रंथ, दहा लोकसाहित्य, लोकसंस्कृतीवरील
ग्रंथ, आठ समीक्षा ग्रंथ, दोन चरित्र ग्रंथ, लेखकांच्या पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावनेची तीन पुस्तके व चौदा संपादने इत्यादी पुस्तके प्रकाशित केली आहेत.
डॉ द.ता.भोसले यांना सोळा जीवन गौरव पुरस्काराने आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे चार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,भारती विद्यापीठ पुणे, बाळासाहेब विखे प्रतिष्ठान, आचार्य अत्रे प्रतिष्ठान, दमाणी साहित्य पुरस्कार इत्यादी मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
एकूण आतापर्यंत दोनशे पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांनी मराठी भाषा अभ्यासक्रम मंडळ, शिवाजी विद्यापीठ पुणे, बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ पुणे या संस्थावर काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील नामांकित व्याख्यान मालेत व्याख्याने दिली आहेत.
तसेच त्यांची सोलापूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, रामानंदतिर्थ विद्यापीठ अमरावती, मराठवाडा विद्यापीठ येथे पुस्तके सभ्यासक्रमासाठी लागली आहेत. त्यांनी साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, लोकसाहित्य लोकसंस्कृती मंडळ या मान्यवर संस्थांवर काम केले आहे. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.