मोहोळ : पोखरापूर (ता. मोहोळ ) येथे जगदंबा मंदिराजवळ समाधीस्त अवस्थेत मानवी सांगाडा मिळून आला असून ती समाधी कोणाची ? तेथे भूयार आहे काय ? कोणत्या महाराजांची समाधी आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. Mohol Ancient Skeleton Found in Samadhi near Temple in Pokharapur Archeology Department Solapur
राष्ट्रीय महामार्गाच्या संपादित क्षेत्रात प्राचीन जगदंबा देवीचे मंदिर पुनरोपन करण्याचे काम शासनाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले आहे. मंदिर परिसरात उत्खनन करत असताना एका समाधीच्या खाली दगडी बांधकामाच्या खोलीत प्राचीन मानवी सांगाडा आढळून आला आहे, त्यामुळे सदरचा मानवी सांगाडा हा प्राचीन स्वामीची संजीवन समाधी आहे का, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
याशिवाय बाजूला खोली आहे की त्या भागातून भुयार आहे हे अद्याप समजले नाही. यापुढील उत्खनन थांबवण्यात आले असून प्राथमिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे ते आल्यानंतर पुढील उत्खनन करण्यात येणार असल्याचे तेथील पुरातन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्या ठिकाणी नेमके काय काय आहे याबाबत चर्चा होत आहे.
काहींच्या अंदाजावरून तो सांगाडा तेथील महाराजांची समाधी असावी व ती सात ते आठशे वर्षांपूर्वीच्या असावी अशीही चर्चा सुरू आहे. काहींच्या मते बांधकाम खेड्यांमधील दिसून येत आहे. त्यामुळे शंभर वर्षाच्या पूर्वीच्या असावा असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. ही समाधी पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक येऊन पाहून जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. याविषयी परिसरातील नागरिकांचे कुतूहल वाढत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ गतिरोधकावरून पडलेल्या दुचाकीवरील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
सोलापूर – दुचाकी पाठीमागे बसून प्रवास करताना गतिरोधकावर वाहन आदळून खाली पडून जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना आज गुरुवारी दुपारी मृत्यू झाला.
गुंडम्मा सिद्धप्पा गुडोडगी (वय ६१ रा. नितीन नगर, अक्कलकोट) असे त्या मयत महिलेचे नाव आहे. त्या ३ मार्च रोजी दुपारी आपल्या मुलासोबत मोटरसायकलवरून सोलापूरहून रुद्धेवाडी येथे निघाल्या होत्या होत्या. अक्कलकोट तालुक्यातील रुद्धेवाडी येथे गतिरोधकावरून खाली कोसळून जखमी झाल्या होत्या. त्यांना दुधनी येथे प्राथमिक उपचार करून सोलापूरात शिवानंद (मुलगा) याने दाखल केले होते, अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
¤ पत्नी बरोबर भांडण; साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर – घरगुती वादातून पत्नी बरोबर भांडण झाल्याने रागाच्या भरात पतीने साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना तारापूर (ता.पंढरपूर) येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सुभाष सिद्राम काळे (वय २५ रा.तारापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याला पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सिद्राम काळे (वडील) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. काल सायंकाळी पत्नीबरोबर भांडण झाल्यानंतर सुभाष काळे याने घरातील छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून पुढील उपचारासाठी सोलापुरात दाखल करण्यात आले. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.