Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सरकारच्या घोषणेचे लिंगायत समाजातून स्वागत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

सरकारच्या घोषणेचे लिंगायत समाजातून स्वागत

Surajya Digital
Last updated: 2023/03/10 at 3:59 PM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

● बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● लिंगायत समाजाची मागणी पूर्ण : आ.विजय देशमुख● सरकारने समाजाला न्याय दिला : सोमनाथ केंगनाळकर ● हे सरकार आपलं सरकार आहे :  जिल्हाप्रमुख शिवसेना  मनिष काळजे● समाजाच्या उन्नतीसाठी एक चांगले पाऊल : उदयशंकर पाटील● लिंगायत समन्वय समितीच्या आंदोलनाला यश : हत्तुरे● सरकारचा क्रांतीकारी निर्णय : गिरीष किवडे

 

सोलापूर : लिंगायत समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार, उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली. याचे शहर आणि जिल्ह्यातील लिंगायत समाजातून स्वागत होत आहे. याबाबत लिंगायत समन्वय समितीने आंदोलनही केले होते. याशिवाय विविध संघटनांनीही याबाबत वारंवार मागणी केली होती. अखेर सर्वांच्या प्रयत्नाला यश आले आहे. Welcome from the Lingayat community to the government’s announcement Basaveshwar Maharaj Economic Development Corporation Solapur Shiva Association

 

विविध समाजातील बेरोजगार युवक- युवतींच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी विविध आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहेत.
मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. इतर मागासवर्गीयांसाठी ओबीसी आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. मातंग समाजासाठी लोकशाहीर महामंडळे कार्यरत आहेत. मागासवर्गीय समाजासाठी महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक महामंडळ कार्यरत विकास महामंडळ आहे. भटक्या व विमुक्त जाती जमातींसाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ कार्यरत  महामंडळ कार्यरत आहे. मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे.

 

या आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर लिंगायत समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार, उद्योग व व्यवसाय निर्मितीसाठी महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी वारंवर होत होती. अखेर ती मागणी भाजप सरकारने मान्य केली आहे. लिंगायत समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार, उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात करत यासाठी ५० कोटींची तरतूदही केली आहे. याचे लिंगायत समाजातून स्वागत होत आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळच्या स्थापनेची घोषणा राज्य शासनाने केल्याबद्दल शिवा संघटनेने राज्य शासनाचे आभार मानले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

शिवा संघटनेकडून १९९६ पासून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी करण्यात येत होती. त्यासाठी संघटनेकडून अनेक आंदोलने आणि शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर ती मागणी पूर्ण झाल्याचे शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष केंगनाळकर म्हणाले.

यावेळी शिवा संघटनेच्यावतीने पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद बडोळे, जिल्हा अध्यक्ष राजकुमार सारणे, आनंद बुकानुवरे, नागप्पा कोप्पा, मल्लिनाथ पाटील, महातेश पाटील, परमेश्वर अरबळे, संगमेश्वर कांबळे आदी उपस्थित होते.

 

● लिंगायत समाजाची मागणी पूर्ण : आ.विजय देशमुख

 

बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करून अनेक वर्षांपासूनची लिंगायत समाजाची मागणी पूर्ण केली आहे. यासाठी ५० कोटी रूपयांची तरतूदही केली आहे. यामुळे लिंगायत समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार, उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया आ. विजयकुमार देशमुख यांनी दिली.

 

● सरकारने समाजाला न्याय दिला : सोमनाथ केंगनाळकर

 

बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करून सरकारने संपूर्ण समाजाला न्याय दिला आहे. ही अनेक वर्षांपासूनची लिंगायत समाजाची मागणी होती. यासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूदही केली आहे. या महामंडळामुळे लिंगायत समाजातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे सर्वसमाजातील लोकांसाठी काम करते, हे या निर्णयावरून सिद्ध होते अशी प्रतिक्रिया के. के. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ केंगनाळकर यांनी दिली.

 

 ● हे सरकार आपलं सरकार आहे :  जिल्हाप्रमुख शिवसेना  मनिष काळजे

हे सरकार आपलं सरकार आहे गोरगरिबांचं सर्वसामान्यांचे सरकार आहे या बजेट मधून समजून येतं..महिला वर्गासाठी देण्यात आलेल्या विशेष सवलती आणि शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या योजना अतिशय चांगले आहेत .
जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज महामंडळ स्थापनेचा निर्णय हा देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित होतो मात्र ते  आपल्या सरकारने दिलेला आहे. मागील महा भकास सरकारने जनतेचे केलेलं नुकसान हे या सरकारने भरून काढलेला आहे..त्यामुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय आता राहणार नाही, असे मनीष काळजे म्हणाले.

● समाजाच्या उन्नतीसाठी एक चांगले पाऊल : उदयशंकर पाटील

 

बसवेश्वर महामंडळ स्थापन होणार ही हिंदू वीरशैव लिंगायत समाजासाठी गौरवास्पद गोष्ट आहे. आता नव युवकांसाठी आर्थिक तरतूद होणार आहे. सरकारने समाजाच्या उन्नतीसाठी एक चांगले पाऊल उचलले आहे, हा निर्णय फक्त हेच सरकार घेऊ शकते. या निर्णयाचे आपण स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया युवा नेते उदयशंकर पाटील यांनी दिली.

● लिंगायत समन्वय समितीच्या आंदोलनाला यश : हत्तुरे

 

लिंगायत समाजातील बेरोजगार युवकांसाठी बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा फडवणीस यांनी केली. याबद्दल सरकारचे अभिनंदन. लिंगायत महामोर्चा वेळी आ. विनय कोरे । यांनी महामंडळ मंजूर करून देण्याचे अभिवचन दिले होते. आज ती अर्थसंकल्पनात मान्य करण्यात आल्याचे लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितले.

 

● सरकारचा क्रांतीकारी निर्णय : गिरीष किवडे

 

बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करत सरकारने हा एक क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. हे सरकार हिंदू धर्म आणि पोटजातीसाठी चांगले निर्णय घेत आहे. यामाध्यमातून लिंगायत समाजातील युवकांना शिक्षणासाठी, उद्योगासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. यापुढेही हे सरकार समाजासाठी चांगले निर्णय घेईल ही अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया युवा उद्योजक गिरीष किवडे यांनी दिली.

 

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

TAGGED: #Welcome #Lingayat #community #government's #announcement #BasaveshwarMaharaj #Economic #Development #Corporation #Solapur #Shiva #Association, #सरकार #घोषणा #लिंगायत #समाज #स्वागत #बसवेश्वरमहाराज #आर्थिकविकासमहामंडळ #शिवासंघटना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोहोळ । पोखरापुरात जगदंबा मंदिराजवळ समाधी अवस्थेत आढळला प्राचीन सांगाडा
Next Article आपल्या वाटेला गेल्यामुळे ठाकरेंचे मुख्यमंत्री पद गेले; राज ठाकरेंचा बंधू उद्धव ठाकरेंना टोला

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?