सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. शहरात कोरोना बाधित असलेल्यांची संख्या १७ आहे. आजच्या अहवालाला तिघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. In Solapur city, the number of corona infected patients is 17, three patients were found today
काल मंगळवारी ६१ रूग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. त्यात तिघे जण पॉझिटिव्ह आढळून आले तर ५८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्राच्या हद्दीतील दोन तर दाराशा हॉस्पीटलच्या हद्दीतील एक रूग्ण आहेत.
कोरोना काही प्रमाणात संपला असला तरी अद्यापही त्याचे रुग्ण महाराष्ट्रासह देशात आढळत आहेत. आज सोलापुरात काल एकाच दिवशी 8 रूग्ण आढळून आले आहेत. तसेच, सोलापूर महापालिका आरोग्य विभागाच्या अहवालात शहरातील एका 80 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद काल झाली आहे.
सोमवारी १२६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाला. त्यात रॅपिड ॲन्टीजेन टेस्टचे २८ तर आरटीपीसीआर टेस्ट ९८ जण होते. त्यापैकी ११८ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन पुरूष तर ५ महिलांचा समावेश आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, सध्या १७ रूग्णांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत सोलापूर शहरात कोरोना बाधित असलेले रूग्ण ३४ हजार ५७२ तर आजपर्यंतची मृतांची संख्या १५१७ वर पोहोचली आहे. रूग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ३३ हजार ३८ एवढी आहे.
सध्या शहरात कोरोना रूग्ण वाढत असल्याने महापालिकेच्या आराेग्य विभागाने आवश्यक त्या सेवासुविधा सज्ज ठेवल्या आहेत. शिवाय शासकीय रूग्णालयानेही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून ठेवली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सर्दी, ताप, खोकला व इतर आजारांची लक्षणे दिसून आल्यास संबंधित नजीकच्या डॉक्टरांना भेटून औषधोपचार करून घ्यावेत असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.
● महाराष्ट्रात H3N2 विषाणूचे 352 रूग्ण : आरोग्यमंत्री
राज्याचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. H3N2 या विषाणूचे राज्यात 352 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे, याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच कोणताही आजार अंगावर काढू नका, असे आवाहन सावंत यांनी लोकांना केले आहे. दरम्यान, H3N2 विषाणू घातक नसून कोणालाही घाबरण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.