Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तब्बल बारा वर्षांपासून प्रलंबित असलेले महापालिकेतील रोस्टर अखेर मंजूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

तब्बल बारा वर्षांपासून प्रलंबित असलेले महापालिकेतील रोस्टर अखेर मंजूर

Surajya Digital
Last updated: 2023/03/16 at 12:55 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

● महापालिका कर्मचारी पदोन्नती व पदभरतीच्या मार्ग मोकळा !

● सामान्य प्रशासन विभागाच्या पाठपुराव्याला यश !

सोलापूर : शासनाने सोलापूर महानगरपालिकेच्या आकृतीबंधाला मंजुरी दिल्यानंतर गेल्या बारा वर्षापासून प्रलंबित असलेल्या बिंदू नामावलीला ( रोस्टर) अखेर पुणे मागासवर्गीय कक्षा कडून तपासून मंजुरी मिळाली आहे. The Municipal Roster which has been pending for almost twelve years is finally approved General Administration Department Solapur यामुळे सोलापूर महापालिकेतील कर्मचारी पद भरती व पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल तेली – उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

Contents
● महापालिका कर्मचारी पदोन्नती व पदभरतीच्या मार्ग मोकळा !● सामान्य प्रशासन विभागाच्या पाठपुराव्याला यश !स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा यशस्वी !

 

महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी पदभार घेतल्यानंतर महापालिकेच्या वतीने शासनाकडून मंजूर झालेल्या आकृतीबंधानुसार बिंदू नामावली (रोस्टर) तयार करण्याच्या प्रक्रियेला गती दिल्याने याचे काम अंतिम टप्प्यात आले होते. गेली बारा वर्षे झाले ही रोस्टर प्रक्रिया महापालिकेकडून हाती घेण्यात आली नव्हती. अखेर पुणे मागासवर्गीय कक्षा कडून तपासून या बिंदू नामावली म्हणजेच रोस्टरला मंजुरी मिळाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

□ एकूण पदसंख्या 1026

पुणे मागासवर्गीय कक्षा कडून तपासून ही बिंदू नामावली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यास मंजुरीही मिळाली आहे. यामध्ये एकूण पदे 51 आहेत. एकूण पदसंख्या 1026 आहे. भरलेली पदे 562 असून रिक्त पदांची संख्या 464 इतकी आहे. दरम्यान, गरजेनुसार महापालिकेतील 340 पदे भरण्यात येणार आहेत. वर्ग अ, ब, क व ड मधील ही बिंदू नामावली पूर्ण करण्यात आली आहे.

गत वर्षी शासनाने सोलापूर महापालिकेच्या आकृतीबंध प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र महापालिकेचा आस्थापना खर्च शासन नियमानुसार ३५ टक्के मर्यादेचा आकडा ओलांडून तो ४१ टक्क्यांपर्यंत झाल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान, आता शासनाने ३५ टक्क्यांची अट शिथिल केल्याने महापालिकेतील भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बिंदू नामावलीत महापालिकेत ५१ पदे काढली असून त्यासाठी शासनाच्या नगर विकास विभागाकडे प्रस्तावाससह पाठपुरावा केला. अशावेळी महापालिकेच्या पस्तीस टक्के खर्चाची अट रद्द केल्याने ३४० पदे भरण्याच्या प्रक्रियेलाही वेग देण्यात आला आहे. भरती प्रक्रियेसाठी टीसीएस या कंपनीशीही लवकरच करार करण्यात येणार आहे. यानंतर मार्च महिन्यात प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार ३४० जागा महापालिकेतील अशा शासन नियमाच्या टक्केवारीनुसार भरती केली जाणार आहेत.

□ महापालिका आयुक्तांच्या
मार्गदर्शनाखाली पाठपुरावा यशस्वी !

महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी पदभार घेतल्यापासून रिक्रुटमेंट रुल म्हणजेच भरती नियमावली, रोस्टर मंजुरी, भरती प्रक्रिया, पदोन्नतीची प्रक्रिया याकडे गांभीर्याने व प्राधान्याने लक्ष घातले होते. आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख एल.एस. दोंतुल यांच्यामार्फत पुणे मागासवर्गीय कक्षाकडे नियमित पाठपुरावा करण्यात आला. रोस्टर मंजुरीसाठी तर महापालिकेचा एक कर्मचारी तळ ठोकून तैनात करण्यात आला होता. या सातत्याने केलेल्या पाठपुरावामुळे अखेर बारा वर्षापासून न केलेली ही रोस्टर प्रक्रिया पूर्ण होऊन त्याला मंजुरी मिळाली आहे.

You Might Also Like

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी

सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग

पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव

सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट

TAGGED: #Municipal #Roster #pending #almost #twelveyears #finally #approved #GeneralAdministration #Department #Solapur, #तब्बल #बारा #वर्षांपासून #प्रलंबित #सोलापूर #महापालिका #रोस्टर #मंजूर #सामान्यप्रशासन #विभाग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लग्नाचे आमिष दाखवून आणलेल्या विधवा महिलेस विष पाजले; हिरज येथील घटना
Next Article उद्यान विभाग अधीक्षकपदी आता झोन अधिकारी दिवाणजी

Latest News

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
देश - विदेश May 9, 2025
संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Top News May 9, 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
सोलापूर May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
सोलापूर May 9, 2025
सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
सोलापूर May 9, 2025
crime
पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
सोलापूर May 9, 2025
पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?