● विधानसभेतील बसण्यावरून राज्यात आ.शिंदे बंधुची चर्चा
कुर्डूवाडी- हर्षल बागल
सुरू असलेल्या अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात राज्याने जे पाहिले त्यावर सर्वांच्याच भुवया ऊंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील बाकावर बसलेले पाहिले गेले. Behind Sanjaymama Ajitdad Babandada Devendra Fadnavis Behind Sanjay Shinde Babanrao Shinde Convention Political तर करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या मागील बाकावर बसलेले दिसले. यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा निमगावच्या शिंदे बंधुची चर्चा होत आहे.
इडीच्या कारवाईने ग्रस्थ असलेले माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी दिल्लीश्वरेच्या वाऱ्या केलेल्या हे काय लपुन राहिले नाही. अधून मधून देवेंद्र फडणवीसांच्या भेटीने भाजप प्रवेशाला फोडणीही टाकली जाते. तर आ. बबनदादांचे बंधू आ. संजयमामा शिंदे हे मात्र आपले राजकीय सर्वस्व मानलेल्या अजितदादांच्या मागे बाकावर बसल्याचे दिसले.
एक भाऊ राष्ट्रवादीत तर एक भाऊ फडणविसांच्या मागे बसल्याने भाजपाच्या वरदहस्तात ही पाच वर्ष घालवणार असे पक्के दिसत आहे. आ. शिंदे बंधु च्या राजकारणाचा वेध अद्याप जिल्ह्यात तरी कुणाला टिपता आला नाही. राज्यात सरकार कुणाचेही असु द्या आपल्या मतदार संघात दोघेही आ. शिंदे बंधु निधी लुटण्यात माहिर आहेत. अगदी फडणवीस सरकारने स्थगिती आणलेल्या योजना देखील सुरु करण्याचा मनसुबा आ. संजयमामा शिंदे यांचा आहे. तर दुसऱ्या बाजुला जी कामे होत नाहीत ती कामे फडणविसांच्या मागे बसून करुन घेण्यात आ. बबनदादा वाकिब आहेत.
● मोहिते – पाटलांचे करमाळा माढ्यात वाढते दौरे
अकलूजच्या मोहिते पाटलांचे करमाळा व माढा मतदारसंघात वाढते दौरे हे जरी लोकसभा मिशन असले तरी दोन्ही आ. शिंदे बंधुना धोकादायकच आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आजच्या विधानसभेतील बसण्याच्या जागेमुळे मोहिते पाटिल देखील बुचकाळ्यात पडले असतील की आ. शिंदे बंधुचा नक्की पक्ष कोणता. भाजपात प्रवेश केला आत्ता येथेही आ. शिंदे फडणविसांच्या जवळ गेल्याने मोहिते पाटलांचे दौरे वाढले असले तरी याचा फारसा काही ऊपयोग होईल असं वाटत नाही.
● सत्ता कुणाचीही असो माझ सरकार अजितदादाच
राज्यात सत्ता भाजपाची असो की काँग्रेस राष्ट्रवादीची आणखी सेनेची असो … माझ्यासाटी सरकार फक्त अजितदादा पवार आहेत असे बेधडक पणे वक्तव्य करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी केले होते. याचाच प्रत्यय बसण्याच्या जागेवरून आला, असं म्हणावे लागेल.
● विधानसभेतच काय दिल्लीत सुध्दा मतदार संघातील कामांसाटी जाऊ
आज मी जे फडणविसांच्या मागे बसलो त्याचा राजकीय सबंध लावू नये. विधानसभेतच काय मतदार संघातील कामांच्या फाईल घेऊन दिल्लीला जायची आपली तयारी आहे. विविध विकासाची कामं ती पूर्ण करायची म्हटल्यावर सरकारकडे जाव लागतं. सत्ताधारी माणसांना भेटल्यावर त्यांच्याजवळ बसल्यावर राजकीय संबंध जोडू नये, असा सुर जरी आ. बबनदादांनी काढला असला तरी जिल्ह्यात व राज्यात दोन्ही बंधुच्या बसण्याने राजकारण ढवळुन निघालंय हे नक्की.