○ 30 खासदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत, अदानी यांचा बचाव का करत आहात, तुम्हीच अदानी आहात का? असा सवाल भाजपला केला आहे. Why are you defending Adani? I will keep asking – Rahul Gandhi Gautam Adani Scam MP Detention Aggressive JPC ‘माझी खासदारकी रद्द केली, मला शिक्षा दिली, कारण मी अदानींविरोधात बोलत होतो, त्याची ही शिक्षा आहे, पण असे असले तरी मी गप्प बसणार नाही, मी अदानींविरोधात बोलत राहणार, जनतेला सत्य सांगणार,’ असे गांधी म्हणाले. दरम्यान राहुल यांना सूरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत आपली बाजू मांडली असून लढण्याची तयारी दर्शवली आहे.
देशात लोकशाहीवर रोज आक्रमण होत असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत केलं आहे. अदानी यांच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, माजी खासदारकी रद्द केली तरी मी घाबरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाते काय ? हा प्रश्न विचारणं सोडणार नाही. मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती होती, म्हणून माझी खासदारकी रद्द केली असंही राहल गांधी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध कसे आहेत ? या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर भाजपने ओरड सुरु केल्याचे राहुल गांधी म्हणाले. संसदेत माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. पण मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. माझ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळाले नसल्याचे गांधी म्हणाले. या देशानं मला प्रेम, आणि सन्मान हे सर्व दिल्याचे राहुल गांधी म्हणाले.
भारतासाठी लढत आहे, त्यासाठी कोणताही किंमत चुकवण्यास तयार असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांची खासदारी रद्द झाल्यानंतर देशभरात काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. तसेच इतर विरोधीपक्षातील नेत्यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.
मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं।
मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 24, 2023
“मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं। मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांच्या ट्वीटला अल्पावधीतच लोकांकडून रिस्पॉन्स दिला जात आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहेत. देशातील सर्व जनता तुमच्यासोबत आहे… असे एका युजर्सने म्हटले तर अन्य एका काँग्रेस समर्थक युजर्सने म्हटले की, हिटलरशाहीच्या विरोधातील लढ्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● 30 खासदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात
लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करत आणि अदानी प्रकरणाच्या जेपीसी चौकशीची मागणी करत संसद भवनापासून निषेध मोर्चा काढणाऱ्या 30 पेक्षा अधिक काँग्रेसच्या खासदारांसह विरोधी पक्षाच्या खासदारांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. के. सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, के. सुरेश, मणिकम टागोर, इम्रान प्रतापगढी आणि मोहम्मद जावेद यांच्यासह प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली.
‘तानाशाही नहीं चलेगी’, ‘अदानीप्रकरणी जेपीसी चौकशी व्हायलाच हवी’ अशा घोषणा देत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला. हा मोर्चा राष्ट्रपती भवनावर धडकणार होता, मात्र विजय चौकातच मोर्चा रोखण्यात आला. मोर्चात सहभागी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
काँग्रेससह, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आम आदमी पार्टी, जनता दल (युनायटेड), भाकप आणि माकपचे खासदार या मोर्चात सहभागी झाले होते.
सत्ताधा-यांच्या गदारोळामुळे संसद ठप्प असून अदानीप्रकरणी चौकशीस टाळाटाळ करणा-या सरकारविरुद्ध आज विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झाले. संसदेच्या आवारात निदर्शने केल्यानंतर खासदार विजय चौकात पोहचले. ‘डेमॉक्रसी इज इन डेंजर’ असे लिहिलेला भलामोठा बॅनर तसेच ‘जेपीसी ऑन अदानी स्पँडल’, सेव्ह एलआयसी असे फलक घेऊन विरोधकांनी धडक दिली.
यावेळी मोदी सरकारचा निषेधाच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. मोदी-शहांच्या हुकूमशाहीविरुद्ध आम्ही लढत राहणार आहोत. अदानींच्या महाघोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर द्यावेच लागेल, असे यावेळी खासदारांनी ठणकावले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी मोदी सरकारवर तोफ डागली. राहुल गांधी सत्य सांगत आहेत, पण त्यांना बोलू दिले जात नाही. याचाच अर्थ लोकशाही संपवण्याचे काम देशात सध्या सुरू आहे. हे थांबले नाही तर देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही, असे खरगे म्हणाले. गेला महिनाभर आम्ही अदानीप्रकरणी चौकशीची मागणी करत आहोत, पण भाजप सरकार टाळाटाळ करत आहे. सरकार घाबरलं आहे. नक्कीच यात काळंबेरं आहे, असे नमूद करताना काहीही झाले तरी आम्ही मागे हटणार नाही, असे खरगे यांनी सांगितले.