पंढरपूर – कानात हेडफोन घालून रूळ ओलांडणाऱ्या तरुणास रेल्वेचा धक्का बसल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी (ता.28) सकाळी घडली. Ambush youths with headphones; Death in train accident Solapur Pandharpur Sangola Miraj Road
या अपघातात जुना कासेगाव रस्ता येथील जयेश जाधव (वय 32 ) याचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पंढरपूर मिरज ही डेमो रेल्वे येथील रेल्वे स्थानकातून निघाली असता उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोरील रुळावरून जयेश जाधव हा कानामध्ये हेडफोन घालून रुळावरून जात होता.
आपल्याच नादात असणाऱ्या जयेशचे रेल्वेच्या आवाजाकडे लक्ष गेले नाही. यामुळे इंजिनची जोरदार धडक बसल्यामुळे तो जागीच ठार झाला. या अपघातामध्ये जयेशचा पाय गुडघ्यापासून तुटून रुळाच्या बाजूला पडला होता. तसेच त्याच्या डोक्याला जोरदार मार लागला होता. घटनेनंतर तातडीने रेल्वे पोलिसांनी धाव घेतली.
● वागदरी रथोत्सव दुर्घटनेत निष्काळजीपणाचा ठेवला ठपका; पंचकमिटीवर गुन्हा दाखल
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त काढलेल्या रथोत्सवात दगडी चाक निखळून दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी देवस्थान समितीच्या पाचजणांवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी (ता. 27) पहाटे दोन वाजता गुन्हा दाखल झाला.
परमेश्वर यात्रा कमिटीच्या रथोत्सव समितीमधील मल्लप्पा निरोळी, सिद्धाराम बटगेरी, श्रीशैल दुर्गे, नागप्पा घोळसगाव व शिवपुत्र दड्ढे (सर्व रा.वागदरी) या पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रथोत्सव समितीमधील पंचकमिटीने रथोत्सवापूर्वी निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई राम चौधरी यांनी दिली. ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त रविवारी सायंकाळी रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रथोत्सव मिरवणूक. निघत असताना अचानक रथाचा लोखंडी रॉड (अक्सल) तुटून पुढचे दगडी चाक निखळून अपघात झाला होता. यामध्ये गंगाराम तिप्पण्णा मंजुळकर- गाडीवडर व इरप्पा (संजय) गिरमल नंदे हे दोघे ठार झाले होते. तर सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे जखमी झाले. या दुर्घटनेनंतर वागदरी गावावर पसरली. शोककळा
दरम्यान, पंचकमिटीवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे फौजदार चंद्रकांत पुजारी यांनी सांगितले.
● मिरज – सांगोला रस्त्यावर पिकअप दुचाकी अपघातात एक ठार एक जखमी
सांगोला : मिरज – सांगोला या राष्ट्रीय महामार्गावरील कमलापूर गावाजवळ अज्ञात पिकअप वाहनाने दुचाकी वाहनास पाठीमागून धडक दिल्याने यात एक मयत आणि एक जखमी झाला. ही घटना आज मंगळवारी (ता .28) सकाळी दहाच्या सुमारास घडली.
भीमराव लक्ष्मण करपे असे मयताचे तर शंकर मच्छिंद्र चौगुले असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील भीमराव लक्ष्मण करपे हा मंगळवेढा येथील नातेवाईक शंकर मच्छिंद्र चौगुले यांच्या मालकीच्या मोटारसायकलवरून कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा यात्रेला गेले होते.
तेथून आज मंगळवारी सकाळी परत आपल्या गावी येत असता मिरज – सांगोला या राष्ट्रीय महामार्गावरील कमलापूर या ठिकाणी सकाळी दहाच्या सुमारास अज्ञात पिक अप वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने भीमराव करपे हा जागीच मयत झाला. तर शंकर चौगुले हा गंभीर जखमी झाला असून सांगोला येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. याबाबत दादासाहेब लक्ष्मण करपे यांनी सांगोला पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.