नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेस पक्ष सोडावा लागला, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्यापुढे पक्षात कुणाचेच काही चालत नाही, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान आम्ही आझाद यांना काय समजले होते आणि ते काय निघाले, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी टीका केली आहे. आझाद यांनी काही कार्यकर्त्यांसोबत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. Former Chief Minister of Jammu and Kashmir openly accused Ghulamnabi Azad of leaving Congress because of Rahul Gandhi
गुलाम नबी आझाद यांच्या ‘आझाद’ या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना काँग्रेसवर कडाडून टीका केली. आझाद आणि काँग्रेस यांचे पाच दशकांचे नाते होते. मात्र पक्षांतर्गत मतभेदानंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. आत्मचरित्राच्या प्रकाशना वेळी त्यांनी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांवरदेखील टीका केली. ते म्हणाले, जे लोक ट्विटरवर सक्रिय आहेत, त्यांच्यापेक्षा मी दोन हजार टक्के अधिक काँग्रेसी आहे. मी २४ कॅरेट खात्रीशीर काँग्रेसी आहे. काँग्रेसमधील इतर नेते १८ कॅरेटदेखील काँग्रेसी नाहीत.
राहुल गांधी यांच्यामुळेच मला काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना आझाद म्हणाले की, मी एकटाच काँग्रेसमधून बाहेर पडलेला व्यक्ती नाही. माझ्यासारखे अनेक नेते, युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत जे काँग्रेसमधून बाहेर पडले. एकदा का तुम्ही काँग्रेसमध्ये राहिलात की, तुमच्याकडे कणा राहत नाही. त्यांच्या आदेशानुसार तुम्हाला वागावे लागते. आझाद यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ‘डेमॉक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी’ नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे.
यूपीए-२ च्या काळात राहुल गांधी यांनी जेव्हा काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा अध्यादेश फाडून टाकला, तेव्हाच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यावर प्रतिक्रिया देऊन त्या कृतीचा विरोध करायला हवा होता. त्या वेळी राहुल गांधी यांच्याविरोधात कोणतीही कारवाई न केल्यामुळे यूपीएचे मंत्रिमंडळ कमकुवत असल्याची टीका आझाद यांनी केली. आझाद त्या वेळी मंत्रिमंडळात सामील होते, हे विशेष.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आझाद म्हणाले की, जर राहुल गांधी यांनी २०१३ साली यूपीए सरकारने काढलेला अध्यादेश फाडला नसता तर आज त्यांचे निलंबन झाले नसते. आम्हाला माहीत होते की, दुसरा पक्ष सत्तेत आल्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्याचा आमच्याविरोधात वापर करू शकतो. मात्र राहुल गांधी यांनी सदर अध्यादेशाला फालतू म्हटले आणि तो फाडून टाकला.
राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये सामील होण्यास सांगितले तर काय कराल? असा प्रश्न विचारला असता आझाद म्हणाले की, त्यांना आमच्यासारखी माणसे नको आहेत. त्यांना फक्त ट्विटरवर सक्रिय असणाऱ्या नेत्यांची आवश्यकता आहे, जे भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसला ५०० जागा मिळतील अशा बाता मारतात. जर सोनिया गांधी यांनी तुम्हाला पक्षात बोलावले तर काय कराल? या प्रश्नाला उत्तर देताना आझाद म्हणाले, सोनिया गांधी यांच्या हातात काही असते तर आम्ही पक्षाच्या बाहेरच पडलो नसतो. गुलाम नबी आझाद यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये आनंद शर्मा, जनार्दन द्विवेदी, तसेच विरोधी पक्षातील खासदार आणि केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सीमावर्ती गावांतील योजना थांबवा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा शिंदे सरकारला इशारा
○ महाराष्ट्र सरकारने जनआरोग्य योजनेचा निर्णय मागे घ्यावा
बंगळुरू – कर्नाटकच्या बेळगावसह 865 मराठी भाषिक गावांवर महाराष्ट्राने दावा केला आहे. आता या गावात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. पण याचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी निषेध करत महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे. “तुम्ही हा प्रकार त्वरित थांबा. जर हे थांबवले नाहीतर आम्ही महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या कन्नड लोकांसाठी योजना सुरू करू”, असा त्यांनी इशारा दिला.
‘महाराष्ट्र सरकारने जनआरोग्य योजनेचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन मी करतो. निर्णय मागे न घेतल्यास आम्हीही अशाच प्रकारचा निर्णय घेऊ,’ असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातला सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने जनआरोग्य योजनांचा लाभ शेजारच्या राज्यातील मराठी भाषिक ८६५ गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच ‘कर्नाटकातील सीमावर्ती गावांतील लोकांना विमा देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र सरकार त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अंतर्गत येत असल्याचे घोषणापत्र घेत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्र सरकारचे हे वर्तन असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या कन्नड लोकांच्या संरक्षणासाठी कर्नाटक सरकारही अशीच विमा योजना राबवेल.