नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर आईकडे राहायला जाणार आहे. राहुल यांनी त्यांचे सामान 10 जनपथ येथील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी हलवण्यास सुरुवात केली आहे. Rahul Gandhi will leave home in time, go to stay with mother Sonia Gandhi, Nagpur Assembly खासदारकी रद्द झाल्याने सरकारी निवासस्थान सोडण्याची नोटीस त्यांना देण्यात आली होती. 24 एप्रिलपर्यंत राहुल यांना निवासस्थान सोडावे लागणार आहे. 2004 पासून मी राहत असलेले घर वेळेत सोडेल, असे उत्तर राहुल यांनी नोटीसला दिले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांच्या घरातील सामान सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी हलवण्यास सुरुवात झाली आहे. राहूल गांधी यांच्या कार्यालयातील कामकाजासाठी नवीन घराचा शोध सुरू आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांच्या लोकसभा सदस्यत्वाची मुदत संपल्याने राहुल गांधी यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाली होती.
त्यास उत्तर देताना राहुल गांधींनी सरकारला लिहिले की, मी 2004 पासून या घरात राहतोय, त्यामुळे या घराशी माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत, पण ज्या संदर्भात तुम्ही मला हे पत्र पाठवले आहे, ते मी नेमलेल्या वेळीच करेन. या पत्रानंतर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राहुल यांना घर देण्याची ऑफर दिली होती. यामध्ये पहिले नाव होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे. ते म्हणाले, जर राहुलला हवे असेल तर ते त्याच्या आईसोबत राहू शकतो, जर ते तिथे सोयीस्कर नसेल तर ते माझ्या घरी राहू शकतात मी त्यांची माझ्या घरी राहण्याची व्यवस्था करेन.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात महाविकास आघाडीची दुसरी सभा १६ एप्रिलला नागपूरमध्ये होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची जाहीर सभाही याच महिन्यात नागपूरमध्ये होणार आहे. ही माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. राहुल आणि प्रियंका यांची एकत्र सभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये यापूर्वी झालेली नाही. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस अधिक आक्रमक झाली आहे.
कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. तेथे १३ एप्रिलला राहुल गांधींची सभा होणार आहे. तर नागपुरात येत्या २० ते २५ एप्रिलदरम्यान सभेचे नियोजन करण्याचा विचार असल्याचे पटोले यांनी सांगितले. १० एप्रिलला प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यात बैठकीत सभेचे ठिकाणावर चर्चा केली जाणार आहे.