मुंबई : वादग्रस्त विधाने टाळा. अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर बोला, सरकारची कामे लोकांना सांगा, सरकारलाच कामाला लावू नका, अशी तंबी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चंद्रकांत पाटील यांना दिली असल्याचे भाजपमधूनच बोलले जात आहे. Tell the government to do the work, don’t make the government do the work; From Babri, Amit Shah gave Tambi Chandrakant Patil political to Chandrakant Dada
‘बाबरी मशिदी पाडताना शिवसेना प्रमुख किंवा शिवसैनिक नव्हते’ असे विधान चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते. त्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. उध्दव ठाकरे यांनी तर राजीनाम्याची मागणीच केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांना खुलासा करण्याची सूचना दिली. भाजप प्रदेशाध्यक्षांनीही ते चंद्रकांत पाटलांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून हात वर केले.
या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नुकतीच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत शहा यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. कोणीही वादग्रस्त विधाने करू नयेत, अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशा शब्दात गृहमंत्री अमित शहा यांनी पाटील यांना तंबी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, माझ्या मनात बाळासाहेबांबद्दल आदर आहे. बाबरी मशीद पाडताना, सगळे हिंदू होते. आनंद दिघे यांनी अयोध्या मंदिर होण्यासाठी सोन्याची वीट पाठवली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी श्रेय घेतलेच होते. चुकूनही बाळासाहेब ठाकरेंबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील दिले आहे.
बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना यांचा काहीही संबंध नाही, असे सांगून भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबांचा घोर अपमान केला आहे. हा अपमान सहन होत नसेल तर बाळासाहेबांचा विचार घेऊन गेलेल्यांनी सत्तेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू नये, एक तर चंद्रकांत पाटलांचा त्यांनी राजीनामा घ्यावा नाहीतर यांनी स्वतः मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावे, असा हल्ला उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी फोन करून सल्ला दिल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी तातडीने पत्रकार परिषद घेत यू टर्न मारला.
या वादावर बोलताना बाबरी खटल्यातील प्रमुख आरोपी व शिवसैनिक पवन पांडे म्हणाले की, स्व. रामचंद्र परमहंस आणि बाळासाहेबांमुळे ५,००० शिवसैनिक बाबरीजवळ पोहोचले. शिवसैनिकांनी तिथले बॅरिकेट्स तोडले आणि आत जाऊन बाबरी पाडली. आजही शिवसैनिकांकडे तिथले दगड आहेत. त्या खटल्यात अनेक शिवसैनिकांची नावे आहेत. बाळासाहेबांवरही खटला दाखल करण्यात आला आहे. आधी सरकार विरुद्ध बाळ ठाकरे असा खटला होता, जो पुढे सरकार विरुद्ध पवन पांडे असा चालला. या खटल्यातील प्रमुख आरोपींमध्ये १५ शिवसैनिकांची नावे होती. शिवसैनिकांनी त्यावेळी सांगितलं आम्हाला बाबरी पाडल्याची कोणतीही खंत नाही. चंद्रकांत पाटलांनी केलेलं वक्तव्य हे मूर्खपणाचं आहे.