Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आसरा पुलाजवळ रेल्वे खाली सुशिक्षित तरुणाची आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

आसरा पुलाजवळ रेल्वे खाली सुशिक्षित तरुणाची आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2023/05/05 at 10:01 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर – धावत्या रेल्वे खाली एका २४ वर्षीय अविवाहीत तरुणाने आत्महत्या केली. ही घटना आसरा पुलाजवळील कल्याण नगर जवळ येथे आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. Educated youth commits suicide under train near Asra Bridge, Solapur

 

धीरज प्रभू कांबळे (वय २४ रा.मंगल रेसिडेन्सी,डीमार्टच्या पाठीमागे) असे मयताचे नाव आहे. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह कल्याणनगर येथे रेल्वे खाली सापडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या पश्चात आई-वडील आणि २ भाऊ असा परिवार आहे.

 

काल गुरुवारी रात्री तो घरातून न सांगता गेला होता. खिशात सापडलेल्या मोबाईल वरून त्याची ओळख पटली. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून यामागचे कारण समजले नाही. हवालदार बहीर्जे पुढील तपास करीत आहेत .

 

● तळेहिप्परगा येथे वाहनाच्या धडकेने पादचारी ठार
सोलापूर –  तुळजापूर रोडवरील तळेहिप्परगा येथे अनोळखी वाहनाच्या धडकेने शिवशरण नागो चौगुले (वय ३५) हे गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडला. शिवशरण नागू चौगुले  हिप्परगा येथील गणपती मंदिरासमोरून रस्ता क्रॉस करीत होते. त्यावेळी अनोळखी वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वी मरण पावले. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 उळे येथे ट्रक अडवून हल्ला ; मध्यप्रदेशचे दोघे जखमी; चौघावर दरोड्याचा गुन्हा

 

सोलापूर – बटाटे वाहतुकीचा ट्रक अडवून दोघांना तीक्ष्ण शस्त्र आणि लोखंडी रॉडने मारहाण करीत १० हजार रुपये लुटण्याची घटना तुळजापूर मार्गावरील उळे (ता.उत्तर सोलापूर) येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात सोलापूर तालुक्याच्या पोलिसांनी चौघा अनोळखी इसमाविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे .

जितेंद्र शोभाराम सिंह (वय ३१) आणि समीर रफिक खान (वय ३२ दोघे रा.भिंड, मध्यप्रदेश) अशी जखमीची नावे आहेत. त्यापैकी समीर शेख याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते दोघे ग्वाल्हेर येथून ट्रक मध्ये बटाटे भरून तुळजापूर मार्गे दावणगिरी (कर्नाटक) येथे निघाले होते.

उळे येथील राजधानी धाब्याजवळ जेवण करून रात्री १० वाजेच्या सुमारास ते पुढच्या प्रवासासाठी निघाले होते. वाटेत जॅक पडल्याने ट्रक उभा करून ते खाली उतरले होते. त्यावेळी चौघा अनोळखी दरोडेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील १० हजार रुपये घेऊन पसार झाले. या घटनेची फिर्याद जितेंद्र सिंह यांनी पोलिसात दाखल केली . पुढील तपास फौजदार निंबाळकर करीत आहेत.

 

 

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Educated #youth #commits #suicide #undertrain #AsraBridge #Solapur, #सोलापूर #आसरा #पुलाजवळ #रेल्वेखाली #सुशिक्षित #तरुण #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष; राजीनामा घेतला माघारी, कालच मिळाले होते संकेत
Next Article सोनी नगरात डीफार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?