● अधिकार्यांकडून उडवा उडवीची उत्तरे
सोलापूर : महापालिका सफाई कर्मचार्यांकडून सुरक्षा साहित्यविना ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून स्वच्छतेचे काम जीव धोक्यात घालून करण्यात येत आहेत. यामुळे सफाई कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महापालिका वरिष्ठ अधिकार्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या या जीवघेणी कामकाज पद्धतीबाबत संताप व्यक्त होत आहे. Drainage cleaning is being done by sanitation workers without safety materials, say, Why is the municipal corporation coming to life, Solapur Municipal Corporation
गुरुवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास पाणीवेस तालीम ते लक्ष्मी भाजी मंडई या मार्गावर जवळपास दहा ते बारा फूट खोल ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून दोन कर्मचारी काम करीत होते. त्यांच्याकडे कोणतेही सुरक्षा साहित्य नव्हते. ही गंभीर बाब आहे. यापूर्वी झालेल्या सफाई कर्मचार्यांच्या मृत्यूच्या घटनांमधून महापालिकेने कोणताही धडा घेतला नाही.
दरम्यान, या सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य का दिले नाही ? यासंदर्भात विचारणा केले असता तेथील निगराणी करणार्या अधिकार्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार हे नामानिराळे राहत असून यात मात्र पोटाची खळगी भरणार्या कर्मचार्यांचा बळी जातो. वारंवार घडणार्या अशा घटना रोखण्यासाठी महापालिका ठोस कार्यवाही करताना दिसून येत नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● यापूर्वी घडल्या होत्या दुर्घटना
यापूर्वी सोलापूर शहरात ड्रेनेजमध्ये उतरून काम करीत असताना गुदमरून सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाही याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी मानल्या जाणार्या सोलापूर शहरात महापालिकेचे सफाई कामगार सुरक्षा साहित्याविना काम करत असल्याचे दिसून येत आहे. सफाई कर्मचारी महापालिकेचे असो अथवा कंत्राट पद्धतीवर असो त्यांना नियमानुसार सुरक्षा साहित्य देण्याची आवश्यकता आहे.
● अधिकार्यांवर कारवाई करण्याची गरज
सफाई कामगार कामावर असताना सुरक्षा साहित्य वापरतो की नाही ? या कामगारांना ऑक्सिजन मास्क, हँडग्लोज यासह इतर सुरक्षा साहित्य देण्यात आले की नाही ? याकडे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. दुर्लक्ष करणार्या बेजबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
● चौकशी करून खबरदारी घेण्यास सांगू : आयुक्त
सुरक्षा साहित्याशिवाय ड्रेनेजमध्ये काम करणे चुकीचे आहे. संबंधित झोन अधिकार्याची चौकशी करून त्यांना सफाई कर्मचार्यांची खबरदारी घेण्यास सांगू, असे पालिका आयुक्त शितल तेली उगले म्हणाल्या.