सोलापूर : अजित उंब्रजकर
लोकसभेबरोबरच इच्छुकांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सोलापूर शहरातील शहर मध्य मतदारसंघाचा विचार करता हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. Sawant brothers target city center; Prof. MLA Praniti Shinde is investigating for Shivaji Sawant या मतदारसंघातून आता प्रा. शिवाजी सावंत हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सावंत जर शहर मध्य मधून निवडणूक रिंगणात उतरले तर शहर मध्य ची लढाई हायव्होल्टेज होण्याची शक्यता आतापासूनच वर्तवण्यात येत आहे.
शहर मतदार संघाचे गेल्या तीन टर्म पासून आ. प्रणिती शिंदे नेतृत्व करत आहेत. भाजप- शिवसेना युतीच्या काळात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. 2009 मध्ये या मतदारसंघातून पुरुषोत्तम बरडे, 2014 मध्ये महेश कोठे तर 2019 मध्ये दिलीप माने यांनी शिवसेनेनेकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. गेल्या वर्षी सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. सध्या चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे शहर मध्य हा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) लढवण्याच्या तयारीत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
काही महिन्यांपूर्वी शहर मध्य मतदार संघातून शिवसेनेकडून मनीष काळजे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र आता प्राध्यापक शिवाजी सावंत हे निवडणूक लढवणार असल्याचे चर्चेले जात आहेत. याबाबत शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहरमध्यची जागा प्राध्यापक सावंत यांच्यासाठी द्यावी, अशी मागणी केली आहे.
प्राध्यापक शिवाजी सावंत हे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. सावंत बंधू प्रत्येक निवडणुकीत नियोजनपूर्वक उतरतात हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झाले आहे. सावंत बंधू खास करून तानाजी सावंत हे राजकारणातील कुबेर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दरियादिलीचे अनेक नमुने संपूर्ण राज्याने पाहिले आहेत. त्यामुळे प्राध्यापक सावंत जर शहर मध्यमधून या निवडणुकीत उतरले तर आमदार प्रणिती शिंदे यांच्याबरोबर त्यांची जोरदार टशन पाहायला मिळणार आहॆ.
● माढा भाजपाकडे जाण्याची शक्यता
भाजप आणि शिवसेना युती म्हणून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. प्राध्यापक शिवाजी सावंत हे दरवेळी माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतात. मात्र सध्या तेथील आमदार बबनदादा शिंदे हे भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते जर भाजपमध्ये आल्यास त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे भाजपकडून माढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील असे बोलले जात आहे. त्यामुळेच प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आपला मोर्चा शहर मध्ये कडे वळवल्याचे दिसत आहॆ.