○ ओडिशा रेल्वे अपघाताने अनेक देश हादरले, पंतप्रधानांनी केली जखमींची चौकशी
नवी दिल्ली : ओडिशा ट्रेन अपघाताच्या प्राथमिक चौकशीत मोठा खुलासा करण्यात आला आहे. सिग्नल न मिळाल्याने ही दुर्घटना घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार बहानगा बाजार स्टेशनवर मालगाडी लूप लाइनवर उभी होती. Cause of Odisha train accident revealed; Injured nation shaken by Narendra Modi questioning death toll at 288 कोरोमंडल एक्सप्रेस जेव्हा स्टेशनवर पोहोचली, तेव्हा या ट्रेनला मेन लाइनसाठी सिग्नल देण्यात आले, पण तातडीने सिग्नल परतही घेण्यात आले. अशा परिस्थिती कोरोमंडल लूप लाइनवर गेल्याने मालगाडीला धडकली.
ओडिशातील बालासोरमधील रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे, अशी माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. ही आकडेवारी आज दुपारी 2 वाजेपर्यंतची आहे, असे रेल्वेने सांगितले आहे. या अपघातात 747 लोक जखमी झाले आहेत आणि 56 गंभीर जखमी आहेत, असेही भारतीय रेल्वेने सांगितले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना तात्काळ मदतही दिली जात असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातावर संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या अपघाताचे वृत्त ऐकूण धक्का बसला, असे त्यांनी म्हटले. तर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यासह ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मालदीव, श्रीलंका, कॅनडा या देशांनीही शोकभावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान ओडिशा येथील दुर्घटनेत 250 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताच्या घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी सीएम ममता म्हणाल्या की, ‘ही राजकारण करण्याची वेळ नाही. हा मोठा अपघात आहे. ट्रेनमध्ये अँटी कोलेजन उपकरण नव्हते. अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. यामागे षडयंत्र असल्याचे दिसते. आमचे सरकार पीडितांच्या कुटुंबाला 5 लाख नुकसान भरपाई देणार आहे. मृतांचा आकडा 500 वर पोहोचू शकतो.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. प्रत्यक्ष रुग्णाजवळ जाऊन पंतप्रधानांनी जखमीची विचारपूस केली. यावेळी आम्ही आपल्यासोबत आहोत. सर्व भारतीय हे आपल्या सोबत आहेत. आम्ही सर्व मदत देत आहोत, असे मोदी जखमींना म्हणाले. लवकरच सर्व बरे होतील, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
https://twitter.com/MsAnushkaShetty/status/1664908513754112001?t=6Qnb1GKIOfDg2aG9NfjYWA&s=19
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ओडिशा येथील भीषण रेल्वे अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांना अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आहे. दरम्यान पंतप्रधान आज बालासोर येथे घटनास्थळाला भेट देणार आहेत. तसेच नंतर जखमींची विचारपूस करणार आहेत. दुसरीकडे दुर्घटना घडलेल्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हजेरी लावली.
अपघातात 250 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान जखमींवर उपचार करण्यासाठी दुसऱ्या राज्यांमध्येही त्यांना हलवले जाण्याची शक्यता आहे.
ओडिशा येथील ट्रेन अपघातात 233 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने याची भयानकता सांगितली. मोठा आवाज झाला आणि मी एकदम जागा झालो. माझ्या अंगावर 10-15 माणसं पडली होती. मी दबला गेलो होतो. मी जेव्हा बोगीतून बाहेर पडलो तेव्हा पाहिलं कुणाचा हात नव्हता, कुणाचा पाय कापला गेला होता. लोक किंचाळत होते. अपघात इतका भीषण होता की मृतदेह ओळखणं कठीण जात होते, काहींचे डोके मिळाले, तर काहीचे धड मिळाले.
ओडिशात ट्रेन अपघातात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. त्यातच ओडिशातील नागरिकांच्या माणुसकीचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. जखमींच्या उपचारांसाठी रक्तदान करण्याकरता ओडिशातील नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. दरम्यान, जखमींचा जीव वाचवण्यासाठी रक्ताची मोठी गरज निर्माण झाली. रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला लोकांनी प्रतिसाद दिला.