मुंबई : राज्य शासनाच्या महसूल विभागातील तलाठी भरतीसाठी विक्रमी 11 लाख अर्ज आले आहे. त्यापैकी 10 लाख उमेदवारांनी परीक्षा शुल्क देखील भरले आहे. Talathi recruitment for 4644 posts, a record 11 lakh applications for recruitment, these measures have been taken by Govt हि भरती 4644 जागांसाठी आहे, इतक्या मोठ्या संख्येत अर्ज आल्याने विविध केंद्रांमध्ये तीन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे, यामध्ये 50 हजार उमेदवार एका शिफ्टमध्ये परीक्षा देतील. 20 दिवस प्रक्रिया चालणार आहे. याबाबत भुमिअभिलेख अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी माहिती दिली.
तलाठी भरतीत 2019 मध्ये घोटाळा समोर आला होता. त्यानंतर परीक्षेत कॉपी करण्याचे प्रकारही वाढले होते. त्यामुळे यावेळी तलाठी परीक्षेवेळी काही उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच उमेदवार कॉपी करण्यासाठी नवीन उपकरणांचा वापर करत असतात. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेर तसेच आतमध्ये प्रवेश केल्यावर उमेदवारांची आधुनिक यंत्रणाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून २६ जूनपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरवात झाली होती. आज (ता.१७) जुलैला तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असताना आज दिवसभर संकेतस्थळ बंद होते.
दरम्यान तलाठी भरती परीक्षा शुल्कात भरमसाट वाढ झाल्याने तरुण- तरुणी, विद्यार्थ्यांसह छात्रभारती विद्यार्थी संघटनेने परीक्षा शुल्क कमी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यात आता वाढ केलीय. महसूल विभागातील (गट क) तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याच्या दिवसाला दहा दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी ‘छात्रभारती’ तर्फे करण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्य सरकारने टप्प्याटप्याने आता शासकीय पदभरतीला मंजुरी देत विविध विभागातील भरती प्रक्रिया सुरु केली आहे. आता महसूल विभागाकडील तलाठी भरती सुरु असून आता सहकार विभागाचीही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सहकार विभागाकडून गट-क संवर्गातील गट -क सहकारी अधिकारी श्रेणी-१ व श्रेणी- २ची पदे भरली जाणार आहेत. तसेच वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघू टंकलेखक अशा पदांचाही त्यात समावेश आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत २१ जुलैपर्यंत आहे.
त्यानंतर महापालिका व जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, आता संचमान्यता झाल्यानंतर ऑगस्टमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्तपदे भरली जाणार आहेत. तरुण-तरूणांनी त्यादृष्टिने तयारी करणे आवश्यक आहे.