● पाणी पिण्यास होकार पण वैद्यकीय उपचारास नकार
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर बसले असताना दुसरीकडे हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. बीडमध्ये संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावण्यात आली आहे. Who is behind the violence? Manoj Jarange Patil thinking of taking a different decision Maratha reservation turned violent MLA arson त्यानंतर जाळपोळ बंद करा, कुठेही जाळपोळ झालेली बातमी माझ्या कानी येऊ देऊ नका, नाहीतर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आपल्याला शांततेत आरक्षण मिळवायचे आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना काही ठिकाणी हिंसाचार झाला आहे. पण या जाळपोळीच्या घटनांमागे सामान्य लोक असू शकत नाही, मी याविषयी सविस्तर माहिती घेतो, त्यानंतर बोलतो, असे अंतरवाली सराटीत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. जाळपोळ करणारे सत्ताधारी तर नाही, अशीही शंका त्यांनी व्यक्त केली. दरम्यान पाणी पिण्यास जरांगे पाटील यांनी होकार दिला असला तरी वैद्यकीय उपचार न घेण्यावर ते ठाम आहेत.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.. त्यांनी घोटभर पाणी प्यावे, यासाठी त्यांचे समर्थक विनंती करत आहे. त्यानंतर त्यांनी पाणी पिण्यासाठी होकार दिला आहे. यावेळी बोलताना जरांगे पाटील भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. मला माझ्या समाजापेक्षा कुणी मोठे नाही, आपल्या समाजाने खूप अन्याय सहन केला आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले आहे. यामध्ये कार्यालयातील काचा, खुर्च्या आणि इतर साहित्य तोडण्यात आले आहे. राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. यावरून मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. त्यांनी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला, कारला आग लावली. तर आंदोलकांनी माजलगावमधील नगरपालिकेची इमारत पेटवून दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बीडमधील घराला आग लावण्यात आली आहे. तसेच कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली आहे. मराठा आरक्षणावरून आक्रमक झालेल्या आंदोलकांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयालाही आग लावण्यात आली आहे. याआधी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांची कार आणि घर पेटवून देण्यात आले होते. भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयात तोडफोड झाली आहे.
माळेगाव पाठोपाठ अजित पवारांना दौंडच्या शुगर कारखान्याच्या मोळी पूजनाला बोलावू नका, अशी भुमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. याबाबत त्यांनी पोलीसांना निवेदन दिले. त्यामुळे अजित पवार दौंडमध्ये मोळी पुजनाला येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याआधी पवारांना मराठा क्रांती मोर्चाने विरोध केल्याने माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ सोहळ्याला पवार आले नव्हते.
बीड- अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या माजलगाव येथील घरावर आक्रमक मराठा आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. तसेच बंगल्याच्या आवारात प्रवेश करत आंदोलकांनी सोळंकेंच्या गाड्या जाळल्या आहेत. सोळंके यांच्या बंगल्यामधून धुराचे लोळ येत असल्याचं दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, मनोज जरांगेच्या संदर्भात सोळंकेंनी काल वक्तव्य केले होते. त्यावरून आंदोलक आक्रमक झाल्याचे समजत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. माजलगाव नगरपालिकेच्या इमारतीला मराठा आंदोलकांनी आग लावली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लावताच सर्वजण कर्मचारी इमारतीबाहेर जीव वाचवण्यासाठी पळाले. याआधी मराठा आंदोलकांनी अजित पवार गटातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करत आलीशान गाडीला अन् बंगल्याला आग लावली होती.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या, आम्ही सरकारला मुदतवाढ देण्यास तयार नाही, उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी निर्णय घ्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत केली आहे. ज्यांचे पुरावे सापडले त्यांच्यासह सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. दरम्यान राज्याचे मंत्री विखे पाटील यांच्याशी माझे फोनवरून बोलणे झाले असून त्यांनी सकारात्मक उत्तर दिल्याचे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी पत्र देण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत अधिक खालावत चालली आहे. त्यांनी अन्न पाणी आणि वैद्यकीय उपचार घेण्यास मनाई केली आहे.