○ ही भेट राजकीय ? अजित पवार दिल्लीला रवाना
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले. पुणे शहरात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ते सर्व जण एकत्र आले होते. प्रतापराव पवार हे शरद पवारांचे बंधू आहेत. Diwali political fireworks, Ajit Pawar and Sharad Pawar came together to leave for Delhi त्यांच्या निवासस्थानी शरद पवार, सुप्रिया सुळे व अजित पवारांची भेट झाली. प्रतापराव पवार हे पुण्यातील बाणेरमध्ये राहतात. त्यांच्या पत्नीची प्रकृती बरी नाही. यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार व शरद पवार एकत्र आले होते.
शुक्रवारी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. पुणे शहरात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी सर्व जण एकत्र आले. शरद पवार यांचे प्रतापराव पवार बंधू आहे. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भेट झाली. प्रतापराव पवार हे पुण्यातील बाणेरमध्ये राहतात. त्यांच्या पत्नीची प्रकृती बरी नाही. यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले. दरवर्षी दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबीय बारामतीमध्ये गोविंदबाग येथे एकत्र येतात. यंदा प्रतापवराव यांच्या पत्नी प्रकृती बरी नसल्यामुळे बारामतीमध्ये येणार नाही. यामुळे ही संपूर्णपणे कौटुंबिक भेट शुक्रवारी झाली आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतापराव पवार यांच्या घरी भेट झाली आहे. यावर बोलताना शरद पवार यांनी ही भेट राजकीय नव्हती कौटुंबिक होती, असे म्हटले. दरम्यान, सकाळी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट झाली आणि नंतर अजित पवार हे दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे पुन्हा राज्यात काही राजकीय घडामोडी होतील, अशी चर्चा सुरु आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. पुणे विमानतळ येथून खासगी विमानाने ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. अजित पवार आज सायंकाळी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे… दरम्यान, काही दिवसांपुर्वी अजित पवार यांना डेंग्यू झाल्याने त्यांनी भेटीगाठी नाकारल्या होत्या. पण अचानक अजित पवार दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे पक्षात दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांची कायदेशीर लढाई आता निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांच्या समोर आणि सुप्रीम कोर्टातही सुरु आहे. आज अचानक पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी मोठ्या हालचाली घडल्या. त्याआधी आज सकाळीच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये भेट घडून आली. त्यानंतर दुपारी प्रतापरावर पवार यांच्या घरी दोन्ही गटाच्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. या भेटीनंतर आता आणखी पुढे काहीतरी मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. कारण अजित पवार पुण्यातहून थेट दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळी सणात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फटाके फुटण्याचे संकते मिळताना दिसत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. अजित पवार गटाची दिल्लीत आज अतिशय महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या बैठकीनंतर अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.