पंढरपूर : कार्तिक शुद्ध एकादशीनिमित्त शासकीय पूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. Pandharpur Government Pooja will be held by Deputy Chief Minister Ajit Pawar Devendra Fadnavis मागील काही दिवस महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री असल्याने शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर पडदा पडला असून, अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मानाची पूजा होणार आहे.
सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन सुरू समाजाने व आंदोलकांनी आरक्षणासंदर्भात असतानाच मराठा समाजातील नेत्यांना संबंधित गाव बंदी केली होती. तर विविध प्रकारे सरकारला पेच निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यावर सरकारने काही दिवसाची मुदत घेतली असून, यावर काहीतरी तोडगा निघेल असे सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, याच काळात पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी कार्तिकी यात्रेसाठी लाखो भाविक येतात एकादशीची शासकीय महापूजा ही नियमाने राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते केली जाते. मात्र मराठा.समाजाच्या आरक्षणासाठी शासकीय पूजेला उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.
त्यावर तूर्तास तरी मुदत घेतल्यामुळे आंदोलक शांत आहेत. आज पंढरपूर येथील कार्तिकी यात्रे एकादशीची मानाची पूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कार्तिकी एकादशीसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत 4 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. पंढरपूरला लाखोच्या संख्येने भाविक यावर्षी हजेरी लावणार आहेत. त्यांना चंद्रभागेत स्नान करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. पंढरपुरात पाणी येण्यासाठी तीन दिवस लागणार आहेत. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाची मागणी सुरु असताना पंढरपुरात कार्तिकी महापूजेच्या मुद्यावर मंदिर समिती प्रशासनासोबतच मराठा आंदोलकांशी सोमवारी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही आमदाराला पंढरपुरात प्रवेश करु देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. त्यातच कार्तिकी पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार की अजित पवार याविषयीही अजून संभ्रमाची स्थिती कायम आहे.
○ कार्तिकीसाठी साडेतीन हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त
शांतता व सुव्यवस्थेसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तब्बल साडेतीन हजार पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. यात्रा काळात संशयास्पद हालचाली आढळल्यास लागलीच खबर देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी वेळापत्र आखले आहे. त्यानुसार पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी फिक्स पाईंटसह मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त असेल, असे सांगण्यात आले. गर्दीचा लाभ उठवून चोऱ्यांचेही प्रमाण वाढू शकते यासाठी पोलिसांचा करडी नजर असणार आहे.
○ असा असणार बंदोबस्त
पोलीस अधीक्षक एक, अपर पोलिस अधीक्षक १, उप अधीक्षक १३, पोलिस निरीक्षक २१, फौजदार व सहा. पोलिस उपनिरीक्षक ११७, पोलिस अंमलदार २०००, होमगार्ड १२००, एक राज्य राखीव पोलिस दल तुकडी असा एकूण ३ हजार ५०० पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी असणार आहे.