Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण, कलेक्टरची फोडली गाडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण, कलेक्टरची फोडली गाडी

Surajya Digital
Last updated: 2023/11/21 at 6:41 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगितले कारण

 

जालना : जालन्यात धनगर आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. Dhangar reservation turned violent in Jalna, Collector’s car smashed यामध्ये कार्यालयाच्या काचा तसेच परिसरात असणाऱ्या गाड्यांची तोडफोड आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

 

आंदोलक हे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले असता तेव्हा अचानक आंदोलनाला हिंसक वळण लागले. दरम्यान, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. आज जालन्यात धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. जालना शहरातील महात्मा गांधी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. शनी मंदिर उड्डाण पूल नूतन वस्ताद अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

जालन्यात धनगर आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. यावर गोपीचंद पडळकरांनी भाष्य केले. “मोर्चा कार्यालयाच्या परिसरात आला असता जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी खाली आले नाहीत. वारंवार विनंती करूनही जिल्हाधिकारी न आल्याने आंदोलकांच्या भावना अनावर झाल्या. तोडफोडीचे आम्ही समर्थन करत नाही, असे पडळकर म्हणाले.

मराठा ओबीसी बरोबरच आता धनगर समाजानं आरक्षणासाठी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. जालन्यात धनगर समाजानं आज जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी पारंपरिक वेशभूषा करुन येऊन मोर्चात सहभाग घेतला. यावेळी शिंदे-फडणवीस-पवार सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात महिलांसह लहान मुले तसंच ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. धनगर समाजास अनुसूचित जातीचं आरक्षण मिळावं, त्याची ताबडतोब योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. ही मागणी प्रामुख्यानं यावेळी धनगर समाजाकडून करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी कलेक्टरची गाडी फोडली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट,  आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

आरक्षण मिळेल, यासाठी नुसताच शब्द देण्यात आला. त्यानंतर २०१४ तसंच २०१९ च्या निवडणुका होऊन गेल्या. तरीही धनगर समाजाला ST प्रवर्गाच्या आरक्षणाचा फायदा मिळाला नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या आधी आमच्या हाती ST प्रमाणपत्र द्या. नाहीतर तुमच्या खुर्च्या रिकाम्या झाल्याशिवाय राहणार नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया आज जालना येथे आयोजित धनगर समाजाच्या मोर्चात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी दिल्या आहेत.

ज्या संविधानावर हा देश चालतो, त्या संविधानानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश केलेला आहे. पण गेल्या ७० वर्षात इथल्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी समाजाला या लाभापासून वंचित ठेवलं आहे. तर २०१४ ला भाजपाने सत्तेत येत असताना त्यावेळी आश्वासन दिलं होतं की, आम्ही सत्तेत आलो तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू. मात्र अजूनही हा प्रश्न प्रलंबित आहे.

तुम्ही आम्हाला वेडे समजू नका, नाहीतर निवडणुकीत तुमच्या पार्श्वभागावर लाथा मारून तुम्हाला घरी पाठवू एवढं लक्षात ठेवा, असा इशारा धनगर आंदोलकांनी दिला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Dhangar #reservation #turned #violent #Jalna #Collector's #car #smashed #Gopichandpadalkar, #जालना #धनगर #आरक्षण #हिंसक #वळण #कलेक्टर #फोडली #गाडी #गोपीचंदपडळकर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सूरत-चेन्नई महामार्ग; अंतिम नोटीसीची मुदत संपली, पोलीस बंदोबस्तात सक्तीने ताबा
Next Article साईबाबा आणि तुकाराम महाराजांचा अपमान करणारे ‘बागेश्वरबाबा’ फडणवीसांना प्रिय

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?