सोलापूर
यात थोडक्यात हकीकत अशी की , दिनांक २१/०६/२०२४ रोजी दुपारी १२:४० वाजण्याच्या सुमारास मौजे बाळे तालुका उत्तर सोलापूर येथील गट नंबर ४१ /३ या शेतामध्ये यातील फिर्यादी देविदास दिगंबर बन्ने आणि मयत पुरुषोत्तम बन्ने हे त्यांच्या शेतीची शासकीय मोजणी करण्याकरता त्यांच्या शेतामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर खाजगी व्यक्तींना घेऊन गेले असता त्या ठिकाणी आरोपी शांत आडके ,सागर आडके , विजयकुमार उर्फ बाळू आडके यांनी त्यांच्यातील शेतीच्या वादातील राग मनात धरून ही शेती आमची आहे मोजणी करायची नाही नाहीतर एकेकाला सोडणार नाही या हरामखोरांना संपवू असे म्हणत सर्व आरोपींनी आणि इतर ७ ते ८ लोकांनी एकत्रित येऊन त्यांच्या हातातील लोखंडी कोयता , लोखंडी पाईपने पुरुषोत्तम बन्ने याच्या डोक्यात दोन्ही हातापायावर, कमरेवर, शरीरावर, वार करून गंभीर जखमी केले होते आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता तसेच फिर्यादी देविदास बन्ने याला देखील सदर आरोपींनी लोखंडी पाईपने उजव्या खांद्यावर आणि पायाच्या पिंडीवर मारहाण करून जखमी केले होते . तदनंतर पुरुषोत्तम बन्ने हा गंभीर त्या जखमी झाल्याने त्याला उपचार करता सिद्धेश्वर हॉस्पिटल तसेच वळसंगकर हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले होते . तदनंतर फिर्यादीने फौझर चाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरुद्ध भा दवी कलम ३०७ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता . तदनंतर दिनांक २३/०६/२०२४ रोजी यातील जखमी असताना पुरुषोत्तम बन्ने हा उपचार घेत असता मयत झाला त्यामुळे पोलिसांनी सदर आरोपींच्या विरुद्ध ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून सर्वच आरोपींना अटक केली. त्यापैकी आरोपी अजित आडके हा फरार असून इतर आरोपी शांतप्पा आडके सागर आडके विजयकुमार उर्फ बाळू आडके महादेव धबाले अमित उर्फ पप्पू आडके यांची तपासासाठी पोलीस कोठडी घेऊन नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली . तदनंतर सदर आरोपींपैकी आरोपी महादेव धबाले अमित आडके आणि विजयकुमार उर्फ बाळू आडके त्यांना जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्यास सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदीप सिंग राजपूत यांनी तीव्र हरकत घेऊन म्हणणे सादर केले तदनंतर सदर जामीन अर्जाचा युक्तिवादापूर्वीच आरोपी विजयकुमार उर्फ बाळू आडके यांनी त्यांचा जामीनाचा अर्ज न्यायालयातून काढून घेतला तर इतर दोन आरोपींच्या जामीन अर्जावर सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत युक्तिवाद केला की सदर आरोपींनी दिवसाढवळ्या नेत्र साक्षीदारांसमोर सदर मयताचा खून केला आहे यातील आरोपी अमित आडके याने गुन्ह्यातील वापरलेली हत्यारे काढून दिलेली आहेत . घटनास्थळाचा पंचनामा मयताचे रक्ताने माखलेले जप्ती पंचनामा मयताचा शवविच्छेदान अहवाल नेत्र साक्षीदारांचे जबाब यावरून या आरोपींनी पुरुषोत्तम बन्ने याचा खून केल्याचे स्पष्टपणे दिसून येते त्यामुळे आणि सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने ते सरकार पक्षावर दबाव आणून सरकार पक्षाचे साक्षीदार फोडण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे. न्यायालयाने आरोपींचा जामिनाचा अर्ज फेटाळून लावला.
यात सरकार पक्षाच्या वतीने ॲड.प्रदीपसिंह राजपूत तर आरोपींच्या वतीने ॲड. संतोष न्हावकर यांनी काम पाहिले