पुणे, 8 मार्च (हिं.स.)।
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रात्री १२ वाजता रस्त्यावर येऊन वाढदिवस साजरी करण्याची पद्धत जोर धरू लागली आहे. रात्री १२ वाजता एखाद्याच्या वाढदिवस असेल तर मोठ्या प्रमाणावर टोळक्यांकडून फटाके फोडून, मोठ्याने साउंड लावून धिंगाणा घालत वाढदिवस साजरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरच आता थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सज्जड दम आणि असे कृत्य करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.
रस्त्यावर वाढदिवस साजरी करून धांगड धिंगाणा अजिबात चालणार नाही. लपून छपून कोणी हे कृत्य करून लपून बसत असेल, तर ठीके पण ज्यादिवशी तो व्यक्ती पकडला जाईल तर त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना जबाबदारी घ्यावी लागेल. अशा स्पष्ट सूचना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत.