मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता मीडिया रिपोर्टनुसार, रियानं सुशांतचे घर सोडण्याआधी एका आयटी प्रोफेशनलकडून 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट करून घेतला होता अशी माहिती समोर आली आहे.
सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीच्या सीबीआय चौकशी दरम्यान, त्यानं हा खुलासा केला. दुसरीकडे सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी असे सांगितले की, डेटा डिलीट केल्याचा अर्थ स्पष्ट आहे. याचा अर्थ सुशांतला मारण्याचा प्लॅन केला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मीडिया रिपोर्टनुसार, पिठानीनं सीबीआयला सांगितले की, डेटा डिलीट करताना सुशांत तेथे उपस्थित होता, त्यानं कोणताही विरोध केला नाही. मात्र पिठानीने त्या हार्ड डिस्कमध्ये काय डेटा होता, याबाबत त्याला माहिती नाही. याआधी रियानं 8 जून रोजी सुशांतचे घर सोडले होते, अशी माहिती होती.
8 जून रोजी रात्री रियानं भाऊ शोविक चक्रवर्तीला सुशांतच्या घरी बोलवले होते. त्यानंतर दोघांनी 3 बॅग पॅक करून सुशांतचे घर सोडले. सीबीआयनं सुशांतच्या बिल्डिंगमधील वॉचमनचीही चौकशी केली. दरम्यान, अशी शक्यता वर्तवली जात आहे की, रियानं डिलीट केलेल्या डेटामध्ये सुशांत आणि तिचे काही खाजगी व्हिडीओ किंवा फोटो असू शकतात.
* रिया चक्रवर्ती विरुद्ध अखेर FIR दाखल
ड्रग्जचा पुरवढा होत असल्याची माहिती मिळाल्याने एनसीबीने रिया विरुद्ध FIR दाखल केला असून त्यामुळे रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत आली आहे. सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता, याचे पुरावे ईडीला मिळाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. रिया विरुद्ध कलम 20, 22, 27, 29 NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईडीने एनसीबीला पाठविलेल्या पत्रात ड्रग्ज संदर्भात पुरावे देण्यात आल्याची माहितीही अस्थाना यांनी दिली आहे. यामुळे आता एनसीबी ही त्या अँगलने तपास करणार आहे. यासंदर्भातले रियाचे काही Whatsapp चॅटही प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली होती. आता एनसीबीच्या संचालकांनीच पुरावे मिळाल्याचा दावा केल्याने प्रकरण अधिक गंभीर झालं आहे.