Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सर्वधर्म समभाव तोडणाऱ्यांना जनता जागा दाखवेल : यशोमती ठाकूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सर्वधर्म समभाव तोडणाऱ्यांना जनता जागा दाखवेल : यशोमती ठाकूर

admin
Last updated: 2025/04/08 at 1:36 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 8 एप्रिल (हिं.स.)काही मंडळी धर्माच्या नावावर राजकारण करून आपली राजकीय पोळी शेकून घेत आहे, एखादे वेळी हे ठिक आहे. मात्र देशातील सहिष्णु जनता फार काळ हे सहन करणार नाही, सर्वधर्म समभाव तोडणाऱ्यांना देशातील जनता जागा दाखवेल, असा इशारा माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी विरोधकांना दिला आहे.

श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर तिक्सा तालुक्यातील मोझरी येथील जवळपास सातशे वर्ष पुरातन श्रीराम मंदिरात अॅड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या पुरातन मंदिरावर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. शिवाय फटाक्यांची आतषबाजी, रामनामाचा गजर सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. ग्रामस्थ मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी झाले होते. अॅड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी जय श्रीरामाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर निनादून गेला होता. शिवाय गावातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते.

काही मुस्लिम बांधवांनी सुद्धा या महोत्सवाला उपस्थिती दर्शवून सर्वधर्म समभावाच्या भावनेची जपणूक केली.

आम्ही काँग्रेसचे आणि हिंदू धर्माचे सुद्धा

आम्ही पिढ्यानपिढ्या श्रीरामाला माननारे अहोत, हा देश सर्वधर्मसमभाव मानणा-यांचा देश आहे. आणि या सर्वधर्मसमभावाला कुणी तडा देत असेल तर या देशातील नागरिक त्यांना कधीही माफ करणार नाहीत. आम्ही काँग्रेसचे आहोत आणि हिंदु धर्माचे सुद्धा, आमची संस्कृती कधीच कुण्या धर्माचा द्वेष करायला शिकवित नाही, राजकारण नसले तरी चालेल मात्र आम्ही सर्वधर्मांचा सन्मान करत राहू, असेही अॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.

You Might Also Like

भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात

राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन

‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू

रत्नागिरी : हिंदीची सक्ती न करण्याचे मनसेकडून शाळांना निवेदन

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सबसिडी बंद झाल्याने सर्वसामान्यांना गॅस परवडेना
Next Article पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ : वन क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसाच्या आत प्रस्ताव तयार करणे आणि पुढील कार्यवाही करण्याचे आदेश

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
देश - विदेश June 19, 2025
इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
देश - विदेश June 19, 2025
भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र June 19, 2025
राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
महाराष्ट्र June 19, 2025
इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
देश - विदेश June 19, 2025
‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?