Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काहींचा चेहरा भोळा पण भानगडी सोळा; एकनाथ शिंदे यांची उबाठावर टीका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

काहींचा चेहरा भोळा पण भानगडी सोळा; एकनाथ शिंदे यांची उबाठावर टीका

admin
Last updated: 2025/04/11 at 2:16 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर, 11 एप्रिल (हिं.स.) सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस यावेत, यासाठी मुख्यमंत्री असताना पायाला भिंगरी लावून अडीच वर्ष काम केले, मात्र काहींनी बंगल्यात राहून ‘एफबी’वर सरकार चालवले. घरात बसून ‘फुकट बाबुराव’प्रमाणे सरकार चालत नाही, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उबाठावर केली. सांगोला विद्या मंदिर प्रशाळेच्या मैदानात आयोजित जाहीर आभार सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच महाआरोग्य शिबीरास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सांगोल्याच्या जनतेच्या ह्रदयात आजही शहाजी बापूच आहेत. सांगोल्यातील नेते साधे आहेत, पण काहींचा चेहरा भोळा पण भानगडी सोळा असं आहे, चेहऱ्यावर जाऊ नका कारण आपणही इतके वर्ष चेहऱ्यामुळे फसलो, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. मागील अडीच वर्षात सांगोला मतदार संघात ५५०० कोटींचा निधी दिला. आजवरच्या इतिहासात इतका निधी कोणीच दिला नव्हता. एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही तर पुढल्या मॅचमध्ये दुप्पट तुटून पडते आणि चॅम्पियन्स ट्रॉफी घरी येते. शहाजी बापू लढवय्ये आहेत. शिवसेनेत जेव्हा उठाव झाला तेव्हा बापू पहिल्या दिवसापासून पहाडासारखे उभे होते. सांगोला दुष्काळमुक्त करण्यासाठी बापूंनी खूप प्रयत्न केले, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, महायुती सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळ कमी करण्यासाठी सिंचन वाढवण्याचा प्रयत्न केले. अडीच वर्षात सरकारने १५० सुप्रमा दिल्या. नुकताच मंत्रिमंडळाने म्हैसाळ उपसासिंचन प्रकल्पासाठी सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी १५०० कोटी मंजूर केले. सांगोल्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पासाठी ८८३.७८ कोटी मंजूर केले. या तालुक्यात सर्वच समाजाच्या कल्याणासाठी बापूंनी कामे केली आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. खुर्च्या बदलल्या तरी मनं बदललेली नाहीत आणि संकल्पसुद्धा बदलले नाहीत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आणखी वेगाने राज्याचा विकास करणार आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्याचे काम आपण करत आहोत, असे ते म्हणाले. जगदगुरु तुकाराम महाराज पुरस्कार, महापराक्रमी महादजी शिंदे पुरस्कार, इंडियन एक्सप्रेसकडून देशातील १०० शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करुन केलेला सन्मान हे सर्व पुरस्कार मुख्यमंत्री नसताना मिळालेले असून त्याचे श्रेय जनतेचे आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे आज येथे लोकार्पण झाले. इंदू मिलमध्ये जगाला हेवा वाटेल असे बाबासाहेबांचे स्मारक साकारले जात आहे. बाबासाहेबांच्या जिथे जिथे पाऊलखुणा आहेत, त्यांच्या आठवणी जिवंत करण्याचे काम महायुती सरकारने केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले होते. मात्र बाबासाहेबांच्या विचारांनी आपले सरकार चालत आहे. या राज्यातील गरिब, शोषित, वंचितांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Next Article रुग्णालयातील डॉक्टरांवर सदोषम नुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा – हर्षवर्धन सपकाळ

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?