Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माढ्याच्या रुग्णालयात ‘असे’ काय घडले? सगळाच स्टाफ आला कारवाईच्या रडारवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

माढ्याच्या रुग्णालयात ‘असे’ काय घडले? सगळाच स्टाफ आला कारवाईच्या रडारवर

admin
Last updated: 2025/04/12 at 1:01 PM
admin
Share
4 Min Read
SHARE

खास प्रतिनिधी
सोलापूर : सिझेरियन टाक्याच्या अवस्थेमधील ओल्या बाळंतिणीसह तिच्या नवर्‍याला रुग्णालयामधील स्वच्छता करण्यास भाग पाडण्याचा अत्यंत धक्कादायक अमानवी प्रकार समोर आल्यानंतर काल गुरुवार (ता.10) सिव्हील सर्जन डॉ. सुहास माने यांच्यासह त्यांच्या पथकाने रात्री उशीरापर्यत घटनेच्या पार्श्‍वभूमीवर, चौकशी केली. यादरम्यान माढा ग्रामीण रुग्णालयामधील स्वच्छतेबद्दल संबंधित सर्वच स्टाफने अत्यंत बेफिकिरपणा दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी रुग्णालयाच्या आस्थापनेवरील वर्ग 1 पासून 4 पर्यंतचा सगळाच स्टाफ दोषी ठरत असून तो कारवाईच्या रडारवर आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समितीचा अहवाल संबधित दोषींवरील कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे.

माढा ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सेवेचे अक्षरश: धिंडवडे निघाले. सिझेरियन टाक्याच्या अवस्थेमधील ओल्या बाळंतिण हेमा धडे या महिलेस पाच दिवस ती दाखल असलेल्या वॉर्डमधील स्वच्छतेचे काम तिजा करण्यास भाग पाडून मरणयातना देण्याचा गंभीर प्रकार झाला. शिवाय तिचे पती शैलेश धडे यांना अत्यंत दुर्गंधी सुटलेल्या टॉयलेटची सफाई करावी लागली. या रुग्णालयामधील हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर सिव्हील सर्जन डॉ. सुहास माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, कुर्डुवाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रणदिवे यांच्या पथकाने गुरुवारी या घटनेच्या अनुषंगाने, संबधित हेमा धेडेंसह तिचे पती शैलेश धेडे आणि रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विवेक नेमाणे यांच्याबरोबरच रुग्णालयाकडील सर्व संबधित स्टाफचे जबाब नोंदवून घेतले.

‘या’ कर्मचार्‍यांचे खुलासे असमाधनकारक;
कारवाईचे बालंट अंगलट येणे अटळच
रुग्णालयामधील संबधित धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर स्मिता जमदाडे (अधिपरिचारिका), लंका काळे (अधिपरिचारिका),संगिता भारती( अधिपरिचारिका) चंद्रकात गोयल, स्वप्निल जाधव (दोघे कक्ष सेवक), सत्यजित राठोड (दंत उपचार सहायक) आणि भरत कोठियाल (सफाई कामगार) या सात कर्मचार्‍यांना घटनेच्या पार्श्‍वभूमीवर,कारणे दाखवा नोटस बजावण्यात आली होती. तातडीने खुलासे सादर करण्याचे आदेश रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विवेक नेमाणे यांनी दिले होते. संबंधित खुलासे समाधानकार आहेत, त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे डॉ. नेमाणे यांनी स्पष्ट केले.

माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छतेच्या पार्श्‍वभूमीवरची ती घटना सत्य आहे. स्वच्छतेत गलथानपणा झाल्याचे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाले आहे. सर्व संबंधितांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. घटनेच्या सखोल चौकशीसाठी पाच सदस्य समिती नियुक्त करण्यात आली. या समितीचा अहवाल कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल. या रुग्णालयाकडील वर्ग 1 पासून 4 पर्यंतचे सगळेजण अस्वच्छतेच्या प्रकरणात दोषी असल्याचे आढळून आले आहे.
डॉ.सुहान माने, सिव्हील सर्जन, सोलापूर

केवळ हेमाच नव्हे, अन्य महिलांना करावी लागली स्वच्छता
माढा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल हेमा धडेसह संबंधित वॉर्डमधील आणखील तिघा ओल्या बाळंतिणीस स्वच्छता करावी लागली, अशी माहिती शैलेश धडे यांनी सांगितले.

डॉ. नेमाणेंचा दोषींना पाठिशी घालण्याचा फसला प्रयत्न;
धडे पती-पत्नीसह अन्य जणांच्या जबाबामुळे पितळ उघड
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नेमाणे यांनी या रुग्णालयात असा गंभीर प्रकार झालाच नसल्याचा कांगावा केला. त्यातून दोषींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न झाला. पण तो फसला. कारण धडे पती-पत्नीसह अन्य जणांच्या वस्तुनिष्ठ आणि खर्‍याखुर्‍या जबाबांमुळे डॉ. नेमाणेंचे पितळ उघड पडलेच. अस्वच्छ ठेवण्यात संबंधित स्टाफ दोषी असल्याचे त्यांनी दैनिक ‘सुराज्य’शी बोलताना कबुल केले.

हेमाने सांगितला खराखुरा प्रकार,
सिस्टर म्हणाल्या, तुमीच स्वच्छता करा!
तिसरा मुलाच्या प्रसुतीसाठी माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल हेमाची प्रसुती सिझेरियनद्वारे करण्यात आले. टाके घेण्यात आले. हे टाके अजून सुकलेदेखील नव्हते. ओले टाके असल्याने हेमा हिला चालता येत नव्हते, बसता येत नव्हते. त्यापेक्षाही पोटाला टाके असल्याकारणाने वाकताना प्रचंड यातना होत होत्या. अशातही हेमाला वॉर्डमधील स्वत:च्या बेड परिसरातील सलाईन बाटल्या उचलण्यासह फरशी पुसणे वगैरे सगळी स्वच्छता करणं भाग पडलं. यादरम्यान टाके खूप दूखले, आईचं अक्षरश: दूध आठवलं या भाषेत हेमा यांनी स्वच्छतेबद्दल सांगितले. जेव्हा अस्वच्छता करण्याबद्दल कोणी नाही का असा प्रश्‍न हेमा हिने रुग्णालयामधील उपचारकर्त्यां सिस्टर यांना विचारला तेव्हा, तुमच्या तुम्हीच स्वच्छता करा, कोणी येणार नाही, असे संबधित सिस्टरने स्पष्ट सांगितले होते, असेही हेमा म्हणाल्या.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केरळ : डावे विद्यार्थी आणि वकिलांमध्ये हाणामारी
Next Article ड्रग्ज प्रकरणी ओमराजेंनी सोडला विरोधकांच्या पायात साप; मग आता काय ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?