प्रतिनिधी
तुळजापूर सोलापूर
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणार्या चर्चेमधील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात खासदार ओमराजे निंबाळकर हे आक्रमक झाले आहेत. राजकारण अन् ड्रग्ज बाजाराने राज्यात अद्यापही खळबळ कायमच असलेल्या तस्करी प्रकरणात निंबाळकरांनी वर्मावर घाव घातल्याचे मानले जात आहे.तस्करीत आढळलेल्यांना नेमके ‘अभय’ कोणाचे हाच त्यांचा उघड सवाल.खळबळजनक प्रकरणातील आरोपी कोणत्या पक्षाचा अन् कुणाचा कार्यकर्ता कोणाचा? हे ओळखावं असं सांगत त्यांनी विरोधकांच्या पायात जणू साप सोडल्याची चर्चा तुळजापुरात रंगली आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचा गर्भित इशारादेखील ओमराजेंनी दिला आहे.
दरम्यान या प्रकरणामध्ये जे-जे कोणी अडकलेत त्यांना वाचवण्यासाठी कोणाचे अभय आहे, हे शोधणे गरजेचे आहे, या प्रकरणातील आरोपी हा कोणत्या पक्षाचा व कुणाचा कार्यकर्ता तुम्हीच पाहा, असा इशारा देत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून धाराशिव जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणातील दोषी माझ्या कितीही जवळचा असला तरी या प्रकरणात त्याला ही शिक्षा झाली पाहिजे, या मताचा मी आहे.असंही त्यांनी म्हटलं आहे.
ओमराजे म्हणताहेत, दोषी कोणीही असु दे, करा अटक
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यातील 21 आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे हे ही पोलिसांपुढाचे आव्हान असणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतले आहे. अद्याप काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणावरून भाजप व शिवसेना ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना खासदार ओमराजे यांनी मोठे वक्तव्य करीत केले असून आरोपी कोणी का असेना ? त्याला पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी केली आहे.
…तर मी पाठिशी घातले असते का?
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला वर्षभरापूर्वीच व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. वर्षभरापूर्वी याबाबत माहिती मिळूनही कारवाई झाली नाही. माझा कार्यकर्ता असता तर मी पाठीशी घातले नसते, वर्षभरापूर्वीच हातोडा मारला असता. या प्रकरणातील आरोपी हा कोणत्या पक्षाचा व कुणाचा कार्यकर्ता आहे हे तुम्हीच पाहा, असा इशारा देत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे.माझ्या पक्षाचा अथवा माझ्या जवळचा कार्यकर्ता असता तर त्याचवेळी पोलिसांच्या स्वाधीन केले असते असेही त्यांनी स्पष्ट केले. जो पर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपी जेलमध्ये जात नाहीत, तो पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलय.
वादात आता काँग्रेसची उडी या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाकडून व भाजपकडून एकमेकांवर आरोप केले जात असताना आता या वादात काँग्रेसने उडी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणातील आरोपीचे व भाजपच्या नेत्याचे फोटो दाखवत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणातील सर्व आरोपीना कधी अटक केली जाणार याकडे लक्ष लागले आहे.