Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नाशिक : तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत २७५ कोटींच्या कामांना मंजुरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

नाशिक : तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत २७५ कोटींच्या कामांना मंजुरी

admin
Last updated: 2025/04/27 at 5:46 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

त्र्यंबकेश्वर, 27 एप्रिल (हिं.स.)।

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वरमध्ये २७५ कोटींची विविध विकासकामे करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत सिंहस्थ कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवत तयार केलेल्या आराखड्यातील कामांना उच्चस्तरीय बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक नुकतीच पार पडली. यावेळी विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते,

दरम्यान, त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असून त्याअनुषंगाने कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने १ हजार, १५० कोटींचा आराखडा तयार केला. या आराखड्यातीन २७५ कोटींची कामे तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत करण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. तर उर्वरित कामे संबंधित विभागांच्या योजनेत समाविष्ट करण्याचे सूचित करण्यात आले.

यामध्ये तीन एकर जागेवर वाहनतळ प्रस्तावित असून याठिकाणी काही दुकानांचे नियोजन आहे. तर उर्वरित ९० टक्के जागा वाहनतळासाठी वापरली जाईल, असे नियोजन करण्याचे सौनिक यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे दुकानांची संख्या वाढल्यास वाहनतळासाठी पुरेशी जागा मिळू शकणार नसल्याचा मुद्दाही बैठकीत मांडला गेला.त्र्यंबकेश्वर मधील आराखड्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यात दर्शन पथ, नवीन रस्त्यांचे बांधकाम, घाटांचे नूतनीकरण, स्वागत कमानींची उभारणी, सुशोभीकरण, नदी संवर्धन, घनकचरा प्रकल्प उभारणी, त्र्यंबकेश्वर वाढीव पाणीपुरवठा योजना, वाहनतळ उभारणी आदि कामांचा समावेश आहे. यातील कोणती कामे तीर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ट करण्यात आली. याबाबतची माहिती बैठकीचे इतिवृत्त प्राप्त झाल्यानंतर समोर येईल, असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आता एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही – देवेंद्र फडणवीस
Next Article नाशिक : कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सहा गायींची सुटका

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?