Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक समता आणण्याचे ध्येय वेगाने पूर्ण होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक समता आणण्याचे ध्येय वेगाने पूर्ण होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

admin
Last updated: 2025/04/30 at 7:14 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 30 एप्रिल (हिं.स.) – “जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह असून यामूळे सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळण्यास मदत होईल. सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, उपेक्षित समाजबांधवांच्या विकासासाठी सरकारला अधिक निधी देता येईल. मागास समाजघटकांचा शैक्षणिक, आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे ध्येय वेगाने साध्य करता येईल. जातनिहाय जनगणनेचा निर्णय म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारने टाकलेलं महत्वपूर्ण, क्रांतीकारी पाऊल आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून हा क्रांतीकारी निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

जातनिहाय जनगणनेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी अनेक व्यक्ती, संस्था, संघटना गेल्या अनेक दशकांपासून करत आहेत. ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या, संवेदनशील नेतृत्वामुळेच पूर्ण होऊ शकली. जातनिहाय जनगणना होत नसल्याने अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती वगळता अन्य जातींच्या लोकसंख्येच्या आर्थिक, सामाजिक स्थितीची माहिती उपलब्ध होत नव्हती.

याचा फटका ओबीसी समाजबांधवांसह इतरही समाजघटकांना फटका बसत होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना योग्य समाजघटकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. यातून सर्व समाजांना विकासाची समान संधी उपलब्ध होईल हा निर्णय येणाऱ्या भविष्यकाळात जातव्यवस्था संपूष्टात आणण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे

You Might Also Like

अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर

जो लढणार नाही त्यांच्यासाठी येणारा काळ खूप कठिण – आमदार टी. राजासिंह

टीका-आरोपांना कामातून उत्तर दिल्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो – एकनाथ शिंदे

राहुल गांधींची पंतप्रधानांवर विखारी टीका

राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article crime सोलापूर : मंगळवेढ्यात तरुणाचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Next Article महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानीत विविध कार्यक्रम

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?