Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला तरुणीवरील अत्याचार प्रकरणी अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला तरुणीवरील अत्याचार प्रकरणी अटक

admin
Last updated: 2025/05/06 at 2:00 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 6 मे (हिं.स.)।भारतीय क्रिकेटपटू असलेल्या शिवालिक शर्माला पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अटक केली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला, असा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी जोधपूरच्या कुडी भगतसुनी हाऊसिंग बोर्ड पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडिता २०२३ मध्ये गुजरात येथील वडोदरा येथे शिवालिकशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले आणि दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांचा सारखपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर शिवालिकने पीडिताशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. पण त्यानंतर त्याने पीडिताशी बोलणे बंद केले आणि तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला. यानंतर पीडिताने शिवालिकविरोधात गेल्या आठवड्यात तक्रार दाखल केली. पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सोमवारी (दि. ५) शिवालिकला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली.

शिवालिक हा गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी आहे. शिवालिक शर्मा हा डावखुरा फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. शिवालिकने २०१६ मध्ये बिन्नू अंडर-१९ ट्रॉफी स्पर्धेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. शिवलिक २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स संघात होता. याशिवाय, तो २०१८- १९ मध्ये रणजी खेळला आहे. त्याने १८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे आणि १ हजार ८७ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये शर्माने १७ डावांमध्ये २४.९२ च्या सरासरीने आणि १४७.८८ च्या स्ट्राईक-रेटने ३४९ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३२२ धावांची नोंद आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फ्रान्स आणि जर्मन विमान कंपन्यांचा पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास नकार
Next Article भारताविरोधात तुर्कीची पाकिस्तानला साथ, कराचीला पाठवली युद्धनौका

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?