Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान

admin
Last updated: 2025/05/09 at 7:47 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

जम्मू, 09 मे (हिं.स.) : जम्मूमधील सांबा सेक्टरमधून गुरुवारी रात्री भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 7 दहशतवादी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कारवाईत ठार झाले आहेत. याबाबत बीएसएफने एका निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.

या कारवाईदरम्यान, बीएसएफने पाकिस्तानी रेंजर्सच्या सीमा चौकीचे मोठे नुकसान केले, जिथून या दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी जोरदार गोळीबार करण्यात येत होता. जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये, 8 आणि 9 मे च्या मध्यरात्री, दहशतवाद्यांच्या एका गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. या दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानी रेंजर्सच्या चौकीतून गोळीबार करण्यात आला. परंतु बीएसएफच्या सतर्क जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न निष्फळ ठरवत किमान 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले.

तत्पूर्वी काल रात्री, पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर विविध ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सडेतोड उत्तर दिले. या कारवाईत एल-70 तोफा, जेयू-23 एमएम, शिल्का प्रणाली आणि इतर प्रगत काउंटर-यूएएस उपकरणांचा मोठ्या प्रमाणत वापर करण्यात आला. पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र विमानांनी जम्मू काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंतच्या शहरांमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे धाडस केले परंतु त्यापैकी कोणत्याही ठिकाणी त्यांना यश मिळाले नाही. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्या सर्वांना हाणून पाडले आहे. पाकिस्तानने संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे, ज्याला भारतीय सैन्य सडेतोड प्रत्युत्तर देत आहे.—————————–

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Next Article पाकिस्तानकडून रुग्णालय व शाळांवर हल्ले- कर्नल कुरेशी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?