सोलापूर, 19 मे (हिं.स.) : बार्शीदरम्यान प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधील प्रत्येकी ५ तोळ्याच्या बिलवरी बांगड्या व पाटल्या असे दहा तोळे दागिने ठेवलेली डबी चोरट्यांनी लंपास केली. बार्शी शहर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. मनिषा गाजरे (रा. डी.वाय.पाटील स्टेडियम शेजारी, नेरळ मुंबई) यांनी फिर्याद दाखल केली.
ही घटना बार्शी बसस्थानवर उघडकीस आली. देववडगाव येथे भाऊ गणपत पाटील याचे घराची वास्तुशांती असल्याने मुंबई येथून आले होते. वास्तुशांतीनंतर माहेरी बेंबळी येथे गेले व तेथून धाराशिव ठाणे या बसने मुंबईला जाण्यासाठी निघाले असताना, बार्शी बसस्थानकावर बस आली. त्यावेळी पर्स उघडी दिसली व त्यामध्ये ठेवलेली दहा तोळे दागिन्यांची डबी चोरट्याने लंपास केल्याचे समजले असे फिर्यादीत म्हटले.