मृतांच्या वारसांना केंद्राकडून प्रत्येकी 2 लाख रुपये
सोलापूर, 19 मे (हिं.स.)। सोलापूरमध्ये एका टेक्स्टाईल युनिटमध्ये आग लागून दुर्दैवी घटना घडली. यात आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. घटनेबद्दल ऐकून माझे मन व्यथित झाले, असे म्हणत पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली.
सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागांमधील एका टावेल कारखान्याला रविवारी पहाटे आग लागली होती. यादीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशामन दलाच्या शंभरहून अधिक गाड्या पाण्याचा मारा केल्यानंतर सायंकाळी आठ वाजण्याची सुमारास आग आटोक्यात आली.सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्सटाईल युनिटला लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.