Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तान, तुर्की व अझरबैजान या देशांच्या उत्पादनांवर नाशिकमध्ये व्यापाऱ्यांचा बहिष्कार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाकिस्तान, तुर्की व अझरबैजान या देशांच्या उत्पादनांवर नाशिकमध्ये व्यापाऱ्यांचा बहिष्कार

admin
Last updated: 2025/05/20 at 6:33 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

नाशिक, 20 मे, (हिं.स.)। पाकिस्तान, तुर्की व अझरबैजान या देशांच्या उत्पादनांचा बहिष्कार करत दहशतवाद आणि व्यापार दोन्ही एकत्र होऊ देणार नाही. देशाची सुरक्षा व आंतरराष्ट्रीय शांतता महत्वाची असून त्यासाठी महाराष्ट्र चेंबरशी संलग्न नाशिकमधील सर्व व्यापारी औद्योगिक संघटनांनी एकमताने पाकिस्तान, तुर्की व अझरबैजान या देशांचा निषेध व धिक्कार करत या देशांच्या उत्पादनांवर बहिष्कार करण्याचा ठराव मंजूर केला. टेरर और ट्रेड एकसाथ नाही चलेगा, अशी भूमिका संजय सोनवणे यांनी मांडली.

दहशतवादास पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला खुला पाठिंबा दर्शविनाऱ्या तुर्कस्तान व अझरबैजान या देशांनी भारत विरोधी भूमिका घेतल्याबद्दल तुर्कस्तान व अझरबैजान या देशांचा बहिष्कार व त्यांच्याशी व्यापार, उद्योग न करण्यासाठी नाशिकमधील सर्व व्यापारी, औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी महाराष्ट्र चेंबरच्या विभागीय शाखा कार्यालयात संपन्न झाली.

सुरवातीला भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पहलगाम येथील भ्याडहल्ल्यात निरपराध मृत्यू झालेल्या नागरिक व ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी प्रास्तविकात दहशतवादास प्रोत्साहन देणाऱ्या व भारत विरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान आणि पाकिस्तानला खुला पाठिबा देणाऱ्या तुर्की व अझरबैजान या देशांचा निषेध केला. तसेच या देशांच्या उत्पादनांचा बहिष्कार करत दहशतवाद आणि व्यापार दोन्ही एकत्र होऊ देणार नाही हि भूमिका मांडली. तसेच तुर्की व अझरबैजान या देशांबरोबरच्या व्यापाराची व त्यांच्याकडून आयात होत असलेल्या उत्पादनांची माहिती दिली. दहशतवाद आणि व्यापार दोन्ही एकत्र होऊ देणार नाही. पाकिस्तान, तुर्की व अझरबैजान या देशांच्या उत्पादनांचा बहिष्कार करत उत्पादनांवर बंदीची मागणी केली. द्राक्ष निर्यात संघटना व चेंबरच्या कृषी व ग्रामविकास समितीचे चेअरमन राजाराम सांगळे यांनी या देशांबरोबर कृषी मालाची आयात निर्यात करू नये यासाठी प्रयत्न करणार असून या देशांबरोबर कृषी मालाचा व्यापार बंद केल्याने आर्थिक नुकसान होणार नसल्याचे सांगितले.

क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी क्रेडाईची भूमिका मांडली. नाशिक धान्य घाऊक किराणा संघटनेची भूमिका भावेश मानेक यांनी मांडली. नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ अमृतकर यांनी भूमिका मांडली. व्यापारी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. पर्यटन असोसिएशनचे माजी अध्यक्ष व चेंबरच्या पर्यटन समितीचे चेअरमन दत्ता भालेराव यांनी पर्यटनसंदर्भात होणारा फायदा व तोटा यांची माहिती दिली. कार्यकारिणी सदस्य सचिन शहा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

हे ठराव झाले मंजुर

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर आयोजित चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमधील सर्व व्यापारी, औद्योगिक संघटनांच्या बैठकीत पाकिस्तान, तुर्की व अझरबैजान या देशांच्या उत्पादनांचा बहिष्कार करत दहशतवाद आणि व्यापार दोन्ही एकत्र होऊ देणार नाही. देशाची सुरक्षा व आंतरराष्ट्रीय शांतता महत्वाची असून त्यासाठी महाराष्ट्र चेंबरशी संलग्न नाशिकमधील सर्व व्यापारी औद्योगिक संघटनांनी पाकिस्तान, तुर्की व अझरबैजान या देशांचा निषेध व धिक्कार करत या देशांच्या उत्पादनांवर बहिष्कार करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. तसेच ही सभा भारतीय सैन्य दलाबद्दल आपला संपूर्ण अभिमान आणि सहकार्य व पाठिंबा व्यक्त करत असून त्यांच्या प्रती कृतज्ञता ही व्यक्त करत असल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भुजबळ आणि माझ्यात मतभेद नाहीत – कोकाटे
Next Article नेपाळमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; जीवितहानी नाही

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?