अमरावती, 30 मे, (हिं.स.)। अकरावी प्रवेशप्रक्रियेला सोमवार, २६ मेपासून सुरुवात करण्यात आली. ४१ हजार १८० जागांकरिता प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून ३२०५ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. ३ जूनपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.
जिल्ह्यासह राज्यात प्रथमच अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. गतवर्षी महापालिका क्षेत्रात ऑनलाइन प्रवेश स्वीकारण्यात आले. यंदा मात्र प्रवेशप्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३१० कनिष्ठ महाविद्यालयात एकूण ४१ हजार १८० जागा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त कला शाखेच्या १८ हजार ६० जागा असून वाणिज्य शाखेच्या १८ हजार ६० जागा असून वाणिज्य शाखेच्या सर्वात कमी म्हणजे ५ हजार ८६० जागा आहेत. पहिली फेरी २६ मे ते १८ जूनपर्यंत चालणार आहे.
२० जूनपासून दुसऱ्या फेरीला सुरूवात होईल. वेळापत्रकानुसार २६ मे ते ३ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज दाखल केले जात आहे.तीन दिवसांत ३,२०५ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता नोंदणी केली आहे. ५ जून रोजी तत्पूर्वी सर्वसाधारण गुणवत्तायादी जाहीर केली जाईल.६ ते ७ जूनदरम्यान यारव आक्षेप स्वीकारून सुधारीत व अंतिम गुणवत्तायादी ८ जून रोजी प्रसिध्द केल्या जाईल. ९ ते ११ जूनदरम्यान शून्य फेरी, कनिष्ठ महाविद्यालयाची निवड व वाटप करणे, ११ ते १८ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना दिलेले महाविद्यालय मान्य असल्यास प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.