Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम

admin
Last updated: 2025/06/02 at 9:30 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 2 जून (हिं.स.)

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त यावर्षी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासमोर आईच्या नावाने एक झाड लावण्याचा अनोखा उपक्रम सुरू करून पर्यावरण दिवस साजरा करण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.हा अनोखा उपक्रम ‘एक पेड माँ के नाम’नुसार राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्हा प्रशासनासह स्थानिक स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी होतील. ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम ५ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिन हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सुमारे एक हजाराहून अधिक गावांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. यात 1 लाखाहून अधिक वृक्षारोपण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच 40 हून अधिक स्वयंसेवी संस्था या उपक्रमात सहभागी होणार आहेत. वेगवेगळ्या भागातील 15 हजाराहून अधिक नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धनाचे महत्व अधोरेखित करणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिक पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभागी होतील आणि पृथ्वीचे रक्षण करण्याचा संकल्प करतील. या अनोख्या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
Next Article ‘ईद’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?