Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: डोनाल्ड ट्रम्प यांच्या अर्थसंकल्पीय विधेयकावर इलॉन मस्कची जोरदार टिका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अर्थसंकल्पीय विधेयकावर इलॉन मस्कची जोरदार टिका

admin
Last updated: 2025/06/04 at 9:03 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंग्टन, 4 जून (हिं.स.)। डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनाच्या ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी’ म्हणजे खर्च कपात विभागात टेस्लाचे मालक इलॉन मस्क दाखल झाले होते.मात्र एका विधेयकावरुन केलेल्या टीकेनंतर मस्क नुकतेच ट्रम्प सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर आता इलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका मोठ्या कर आणि खर्च विधेयकावर जोरदार टीका केली आहे.त्यामुळे आता ट्रम्प यांच्या विजयात मोठा वाटा असणारे इलॉन मस्क हे राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

मस्क यांनी वन बिग ब्युटीफुल बिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कायद्यावरुन जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांनी सिनेट रिपब्लिकनना हे विधेयक मंजूर करण्याचे आवाहन केल्यानंतर मस्क यांनी भाष्य केलं. मस्क म्हणाले, “मला माफ करा पण मी आता ते सहन करू शकत नाही. काँग्रेसमधील हे विधेयक प्रचंड, अपमानजनक आणि पूर्णपणे घृणास्पद आहे. ज्यांनी याला मतदान केले त्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही चूक केली आहे,” अशी एक्स पोस्ट मस्क यांनी केली.

दुसरीकडे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी मस्क यांच्या टीकेवर प्रत्युतर देताना, “या विधेयकाबद्दल ते काय विचार करतात हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आधीच माहित होते, पण मस्क यांच्या या निर्यणामुळे त्यांचे (ट्रम्प) मत बदलणार नाही. हे एक मोठे विधेयक आहे आणि राष्ट्राध्यक्ष त्याच्या बाजूने उभे आहेत,” असं म्हटलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्ती केल्यानंतर मस्क खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सीमधून प्रयत्न करत होते. मस्क यांनी अनेक संघीय यंत्रणांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तरी त्यांना अपेक्षित असलेली मोठी बचत झाली नाही. त्यानंतर डॉजमध्ये विशेष सरकारी कर्मचारी म्हणून त्यांची औपचारिक भूमिका गेल्या आठवड्यात संपली.

अवघ्या चार महिन्यांत सरकारमधून इलॉन मस्क बाहेर पडले. ट्रम्प यांच्या अर्थसंकल्पाबद्दल निराशा व्यक्त करत मस्क सरकारमधून बाहेर पडले होते. अर्थसंकल्पामध्ये मल्टी ट्रिलियन डॉलरच्या कर सवलती आणि संरक्षण खर्च वाढवण्याचे प्रस्ताव होते. त्यानंतर आता मस्क यांनी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या अर्थसंकल्पीय विधेयकावर हल्लाबोल केला आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अंतराळवीर शुभांशू शुक्ला 10 जूनला करणार अंतराळ मोहिमेसाठी उड्डाण
Next Article नेरळ माथेरान मिनी ट्रेन बंद

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?