Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सागरी मोहिमेचा चमू सेशेल्सपर्यंतचा 1,800 सागरी मैलांचा प्रवास पूर्ण मायदेशी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

सागरी मोहिमेचा चमू सेशेल्सपर्यंतचा 1,800 सागरी मैलांचा प्रवास पूर्ण मायदेशी

admin
Last updated: 2025/06/05 at 5:58 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 5 जून (हिं.स.) –

तिन्ही सैन्य दलांच्या केवळ महिला सदस्यांचा समावेश असलेला सागरी मोहिमेचा चमू बुधवार, 4 जून रोजी मायदेशी परतला. या चमूने सेशेल्सपर्यंतचा 1,800 सागरी मैलांचा ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय प्रवास पूर्ण केला. या ऐतिहासिक मोहिमेला 7 एप्रिल रोजी प्रारंभ झाला होता. भारतीय सशस्त्र दलातील केवळ महिला सदस्यांचा समावेश असलेल्या चमून केलेली ही आंतरराष्ट्रीय खुल्या समुद्रातील ही पहिली मोहीम ठरली आहे.

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कमांडंट, लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश यांनी या मोहिमेला मुंबईत झालेल्या औपचारिक समारंभात झेंडा दाखवून रवाना केले होते. ही मोहीम लिंगभाव समावेशक कार्यान्वयनीन उत्कृष्टतेच्या वाटचातील एक मैलाचा दगड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या चमूचे धैर्य आणि दृढनिश्चयाचेही त्यांनी कौतुक केले. सशस्त्र दलांच्या परिचालन क्षमतेत महत्वाचे योगदान देणाऱ्यांमध्ये महिलांची भूमिका वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

त्रिवेणी (56 फुटांची पाल नौका – sailing yacht) या स्वदेशी बनावटीच्या भारताच्या सशस्त्र दलाच्या सेवेतील जहाजावरून लष्कर, नौदल आणि वायुसेनेतील 11 महिला अधिकाऱ्यांच्या चमूने जवळपास दोन महिने खुल्या समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत ही मोहिम पूर्ण केली. समुद्री वाऱ्याच्या तीव्र झडपा, सातत्याने बिघडणारी सागरी स्थिती आणि दीर्घकाळ थकवा सहन करत, या चमूने विलक्षण सहनशक्ती आणि अतूट दृढनिश्चयाचे दर्शन घडवले. या चमूत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची नावे खाली दिली आहेत. :

– भारतीय लष्कर : लेफ्टनंट कर्नल अनुजा, मेजर करमजीत, मेजर तान्या, कॅप्टन ओमिता, कॅप्टन दौली आणि कॅप्टन प्राजक्ता

– भारतीय नौदल : लेफ्टनंट कमांडर प्रियांका

– भारतीय वायुसेना : स्क्वाड्रन लीडर विभा, स्क्वाड्रन लीडर श्रद्धा, स्क्वाड्रन लीडर अरुवी आणि स्क्वाड्रन लीडर वैशाली

या मोहिमेदरम्यान सेशेल्समधल्या थांब्याच्या वेळी या चमूने उच्च-स्तरीय संरक्षण विषयक आणि राजनैतिक कार्यक्रमांमध्येही सहभाग नोंदवला. याअंतर्गत त्यांनी सेशेल्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, संयुक्त संरक्षण दलांचे प्रमुख आणि सेशेल्समधील भारताचे उच्चायुक्त यांच्याशी औपचारिक संवादही साधला. या कार्यक्रमांमुळे या चमूला आपली सागरी मुत्सद्देगिरी अधिक सक्षम करण्यात मदत झाली, तसेच हिंद महासागरातील बेट स्वरुपातील राष्ट्रांसोबत भारताची धोरणात्मक भागीदारीही अधिक विस्तारली.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठीचे कार्य नव्या जोमाने सुरु करावे – पंतप्रधान
Next Article बांगलादेशी नागरिकांकडून बीएसएफ जवानाच्या अपहरणाचा प्रयत्न

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?