Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ट्रम्प यांच्यावर केलेल्या पोस्टबद्दल मस्क यांच्याकडून खेद व्यक्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ट्रम्प यांच्यावर केलेल्या पोस्टबद्दल मस्क यांच्याकडून खेद व्यक्त

admin
Last updated: 2025/06/11 at 4:32 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

वॉशिंगटन , 11 जून (हिं.स.)।मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती इलॉन मस्क यांच्यात सुरु असलेला वाद आता मिटताना दिसत आहे. मस्क यांनी आता ट्रम्प यांच्यावर केलेल्या पोस्टबद्दल खेद व्यक्त केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात काही दिवसांपासून मोठा वाद निर्माण झाला आहे.या वादाचे रुपांतर शाब्दिक युद्धात झाले असून दोघेही ‘एक्स’वर एकमेकांविरोधात अतिशय टोकाच्या पोस्ट करताना दिसत आहेत.पण, या वादात आता इलॉन मस्क यांनी माघार घेतल्याचे दिसते. त्यांनी एक्सवर पोस्ट करत, यापूर्वी ट्रम्प यांच्याविरोधात केलेल्या सर्व पोस्टबाबत पश्चाताप व्यक्त केला आहे.

इलॉन मस्क यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, “गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलच्या माझ्या काही पोस्टबद्दल मला वाईट वाटते. त्या खूप पुढे गेल्या.”

इलॉन मस्क यांच्या कंपन्यांशी असलेल्या करारांत कपात करण्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यावर अंतराळवीरांची, तसेच इतर साहित्याची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ड्रॅगन कॅप्सूल’ची सेवाच बंद करण्याची धमकी मस्क यांनी सोशल मीडियावर दिली. इलॉन मस्क यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ या विधेयकावर टीका केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्युत्तर दिले. ‘मस्क यांना हे विधेयक माहित होते. त्यांनी सरकारी पद सोडेपर्यंत त्यांना त्यावर कोणताही आक्षेप नव्हता’, असा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र, मस्क यांनी हा दावा फेटाळून लावला.

एवढेच नाही, तर मस्क यांनी ट्रम्प यांच्या महाभियोगाला पाठिंबा देणारी पोस्ट केली आणि ट्रम्प यांचे जेफ्री एपस्टाईनशी असलेले जुने संबंध उकरुन काढले. त्यानंतर हे प्रकरण इतके वाढले की, ट्रम्प यांनी उघडपणे मस्कच्या कंपन्यांसोबत, विशेषतः स्पेसएक्ससोबतचे सरकारी करार आणि अनुदान संपवण्याचा इशारा दिला. तसेच, इलॉन मस्कने डेमोक्रॅटिक उमेदवारांना, विशेषतः रिपब्लिकन पक्षाच्या कर विधेयकाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना निधी दिला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या खर्च आणि कर कपात विधेयकात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवरील कर सूट संपवण्याचा प्रस्ताव आहे. अमेरिकेचे मागील बायडेन सरकार नवीन ईव्ही खरेदीवर $7500 ची कर सूट देत असे. ट्रम्प ते संपवणार होते. हा इलॉन मस्क यांच्या टेस्लाला थेट धक्का आहे.इलॉन मस्क त्यांच्या विश्वासू जेरेड आयझॅकमन यांना अमेरिकन अंतराळ संस्था नासामध्ये प्रशासक म्हणून नियुक्त करू इच्छित होते, परंतु ट्रम्प यांनी त्यांच्या शिफारशीकडे दुर्लक्ष केले. यावरुन दोघांमध्ये वाद वाढला. पण, आता मस्क यांनी पश्चाताप व्यक्त केला आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर – काँग्रेस तालुकाध्यक्षावर गुन्हा
Next Article तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक – संजय शिरसाट

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?