Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

admin
Last updated: 2025/06/17 at 6:43 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुदुचेरी, 17 जून (हिं.स.) –

आपल्याला डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या स्वरूपात मानवी संसाधनांची,अधिक निदान केंद्रांची, अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. औषधांसाठी दुकाने तसेच सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्रे वाढवायची आहेत. यालाच आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी म्हणता येईल, असे वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

पुदुचेरी येथील जेआयपीएमईआरच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना त्यांनी आरोग्याचे महत्त्व सांगितले.

ते ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सांगताना ते म्हणाले, “जगातील सर्वात शांतताप्रिय राष्ट्राला जे कधीही विस्तारवादात सहभागी झालेले नाही त्याला भयावह दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला. पंतप्रधानांनी राष्ट्राला वचन दिले: दहशतवाद अजिबात खपवून घेतला जाणार नाही. हे पंतप्रधानांचे वचन खरे केल्याबद्दल मी आपल्या सशस्त्र दलांचे अभिनंदन करतो, कारण मुरीदके आणि बहावलपूर आपल्या ब्रह्मोसच्या सामर्थ्याचे साक्षीदार आहेत. संरक्षण साहित्याचे स्वदेशी उत्पादन आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे याची जाणीव जगाला झाली आहे.”

“कोणत्याही प्रगतीसाठी शांतता आवश्यक असून ही शांतता ताकद असेल तर मिळते. आपण युद्धासाठी नेहमीच सज्ज असणे ही शांततेची सर्वोत्तम हमी आहे आणि ती तेव्हाच मिळते जेव्हा राष्ट्रीय मानसिकता- राष्ट्र प्रथम ही असते “असेही ते म्हणाले.

बहुपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याच्या अलीकडच्या निर्णयाचे धनखड यांनी कौतुक केले. ते म्हणाले, “राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष आणि हितसंबंधांच्या पलीकडे आहेत. पंतप्रधानांनी परदेशात संसद सदस्यांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा दूरदर्शीपणा दाखवला, देशात आणि बाहेर या शिष्टमंडळाला योग्य प्रतिसाद मिळाला याचा मला आनंद आहे. सर्व राजकीय पक्ष त्यानिमित्ताने एकजूट झाले. राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय विकासासाठी आपल्याला हे कायम आवश्यक आहे.”

—————

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
Next Article कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?