Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

admin
Last updated: 2025/06/25 at 4:36 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 25 जून (हिं.स.)। महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्याच्या दक्षतेसाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून म्हणजे उपमुख्यमंत्री असताना फडणवीस हे सातत्याने पुण्यात येत आहेत. मात्र मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून त्यांच्या पुण्याच्या दौऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एका महिन्यात किमान पाच ते सात वेळा फडणवीस हे पुण्यात येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यावरील विशेष लक्ष राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकसभेची २०२४ निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे निवडणूक लढविणार अशी चर्चा होती. त्यावर माझे पुण्यावर विशेष प्रेम आहे; पण लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे फडणवीस यांनी पुण्यात जाहीर केले होते. उपमुख्यमंत्री असतानाही फडणवीस यांचे पुणे दौरे वारंवार होत असत. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात कलगीतुरा रंगला होता. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना डावलून अखेर अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. पुणे महापालिकेत २०१७ साली भाजपची एकहाती सत्ता होती. त्यानंतर २०२२ नंतर महापालिकेत प्रशासकराज आहे. त्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार युतीचा निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले आहे.

—————

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
Next Article ‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?