Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अखेर ३८ दिवसांनंतर ब्रिटिश लढाऊ विमान एफ-35बीने केरळहून भरलं उड्डाण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अखेर ३८ दिवसांनंतर ब्रिटिश लढाऊ विमान एफ-35बीने केरळहून भरलं उड्डाण

admin
Last updated: 2025/07/22 at 6:01 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

तिरुवनंतपुरम, 22 जुलै  – मागील ३८ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे केरळच्या तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकून पडलेले ब्रिटनच्या रॉयल नेव्हीचे अत्याधुनिक एफ-35बी लाइटनिंग लढाऊ विमान अखेर दुरुस्तीनंतर मंगळवारी (दि. २२) सकाळी ब्रिटनच्या दिशेने यशस्वी उड्डाण केले.

१४ जून रोजी तांत्रिक अडचणीमुळे या विमानाने आपत्कालीन लँडिंग केले होते. त्यानंतर विमानाची दुरुस्ती सुरू होती. ब्रिटनमधून इंजिनिअरिंग पथक ६ जुलै रोजी भारतात दाखल झाले होते. अखेर, सखोल तपासणी आणि दुरुस्तीच्या प्रक्रियेनंतर आज सकाळी १०.५० वाजता या विमानाने उड्डाण केले.

एफ-35बी लाइटनिंग हे जगातील सर्वात प्रगत स्टेल्थ लढाऊ विमानांपैकी एक असून, ते ब्रिटनच्या अत्याधुनिक लढाऊ ताफ्याचा महत्त्वाचा भाग आहे. या विमानाची किंमत ११० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त आहे. सोमवारी विमानाला हँगरमधून बाहेर काढून रनवेवर हलवण्यात आले होते.

दुरुस्ती दरम्यान काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, हे विमान सुटे करून ब्रिटनला परत नेले जाईल. मात्र, दुरुस्ती यशस्वी झाल्यामुळे विमान जसेच्या तसे उड्डाणासाठी सज्ज झाले.

या यशस्वी दुरुस्तीनंतर ब्रिटिश उच्चायोगाने भारताचे आभार मानले आहेत. उच्चायोगाच्या प्रवक्त्याने म्हटले की,

“एफ-३५बीने आज भारतातून यशस्वी उड्डाण केले. आमच्या अभियांत्रिकी पथकाने सुरक्षा आणि तांत्रिक दुरुस्ती पूर्ण केली. भारत सरकार आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. भारतासोबतची आमची संरक्षण भागीदारी अधिक दृढ होईल याची आम्हाला खात्री आहे.“

ही घटना केवळ एक दुरुस्ती नसून, भारत-ब्रिटन यांच्यातील संरक्षण सहकार्याच्या दृढ संबंधांचे प्रतिक ठरली आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र, आमदार चंद्रकांत पाटील पोलिसांकडून ताब्यात; मुक्ताईनगर बंद
Next Article भारताची पाकिस्तानी विमानांवर हवाई बंदी २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?