रायगड, 1 ऑगस्ट।
रायगडच्या राजकारणात उलथापालथ होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. ॲड. राजीव (राजू) साबळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
२ ऑगस्ट रोजी ते शिंदे गटाच्या शिवसेनेला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार, अशी माहिती समोर येत आहे.
खासदार सुनील तटकरे यांनीही राजू साबळे यांच्या पक्षप्रवेशाची खात्री दिल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पक्षप्रवेशाचा कार्यक्रम माणगाव येथे मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएससी शाळेच्या पटांगणात होणार असून तयारी सुरू आहे.