चेन्नई : प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (वय 74) यांचे आज (शुक्रवार) निधन झाले आहे. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी करोनावर मात केली होती. मात्र, त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे बॉलिवडूवर शोककळा पसरली असून, अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटले जाते. त्यांनी जवळपास ४० हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे. अभिनेता सलमान खानसाठी ‘तुमसे मिलने की तमन्ना है’, ‘पहला पहला प्यार है’, ‘दिल दीवाना’ आणि ‘साथिया तू ने ये क्या किया’ यांसारखी अनेक गाणी गायली होती.
दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते की, ‘गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाही. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला.’
प्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रमण्यम यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सलमान खानचा आवाज म्हणून एस पी बालसुब्रमण्यम यांना ओळखले जायचे. सलमान खानच्या चित्रपटातील ‘तुमसे मिलने की तमन्ना है’, ‘पहला पहला प्यार है’, ‘दिल दीवाना’ आणि ‘साथिया तू ने ये क्या किया’ यासारखी अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी गायली होती.

४ जून १९४६ रोजी आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेले बालसुब्रमण्यम यांना सहा वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने आणि आंध्र प्रदेश सरकारकडून २५ वेळा तेलुगु चित्रपटांतील योगदानासाठी नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
