हनोई : नुकतीच एक धक्कादायक आणि किळसवाणी घटना घटना समोर आली आहे. वापरलेले कंडोम केवळ धुवून ते नव्या रूपात विक्रीसाठी आणले जात असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हा प्रकार समोर आला असून त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
गर्भधारणा टाळण्यासाठी, सुरक्षित लैंगिक संबंधासाठी आणि लैंगिक आजार टाळण्यासाठी कंडोम किती महत्वाचा असतो हे सर्वांनाच माहीत आहे. कंडोमचं महत्व लोकांना आता कुठे थोडं कळायला लागलं आहे.
पण याचं मार्केट वाढत असताना याचं ब्लॅक मार्केटींगही अधिक होताना दिसतं. व्हिएतनामच्या एका फॅक्टरीवर धाड टाकल्यावर अधिकाऱ्यांना जे दिसलं ते पाहून तर सगळेच हैराण झाले. कारण इथे वापरलेले कंडोम्स पुन्हा स्वच्छ करून पॅकेटमध्ये पॅक केले जात होते.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी शनिवारी येथील एका फॅक्टरीवर धाड टाकली. इथे त्यांना ३ लाख २० हजार वापरलेले कंडोम आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी ही फॅक्टरी सील केली.
व्हिएतनाममधील स्थानिक प्रसारमाध्यमानं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एका कंपनीवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना त्या कंपनीत वापरलेले तब्बल ३ लाख २० हजार कंडोम सापडले. त्यानंतर पोलिसांनी ही कंपनी सील केली. बिन डाँग प्रांतातील हो मिन्ह सिटीजवळील एका कंपनीत हा संपूर्ण प्रकार सुरू होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यामध्ये एका टोळीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही टोळी रस्त्यावर पडलेले वापरलेले कंडोम गोळा करून ते धुवून त्यांना नव्या पॅकमध्ये सील करत. त्यानंतर ते कंडोमचे पॅकेट पुन्हा मार्केटमध्ये विक्रीला उपलब्ध करून दिले जात असत. हे कंडोम गरम पाण्यात टाकून धुतले जात होते. त्यानंतर मशीनच्या सहाय्यानं ते सुकवण्यात येत आणि नंतर ते पुन्हा पॅक केले जात होते. अशा प्रकारे हजारो कंडोमची विक्री करण्यात आल्याची कबुलीही कंपनीच्या मालकाकडून देण्यात आली.
दरम्यान या कंपनीनं कायदा मोडला असून लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. येथे सापडलेले एकूण ३ लाख २० हजार कंडोम ताब्यात घेण्यात आले आहेत.
* असा लागला छडा
तपासातून समोर आले की, काही लोक रस्त्यांवर पडलेले वापरलेले कंडोम्स जमा करत होते. ते धुवून आणि सुकवून पुन्हा पॅकेटमध्ये पॅक करत होते. नंतर हे कंडोम पुन्हा मार्केटमध्ये विकण्यासाठी पाठवले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे हे कंडोम फक्त पाण्याने धुवून त्यांना पुन्हा शेप दिला जात होता. नंतर पॅक केले जात होते.
सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुन्हेगारांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, कंडोम हे केवळ एकदा वापरण्यासाठी तयार केले जात असतात. पुन्हा त्याचाच वापर करून इन्फेक्शनचा धोका असतो. अशात लोकांच्या आरोग्यासोबत अशाप्रकारे खेळणं कंपनीच्या मालकाला चांगलंच महागात पडणार आहे. स्थानिक लोकांमध्ये या प्रकरणावरून चांगलाच संताप आहे. कारण आतापर्यंत या फॅक्टरीमधून हजारो कंडोम्स मार्केटमध्ये पोहोचले आहेत.